Wednesday, July 3, 2024

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्स पेक्षा स्टारकिड्सचीच जास्त चलती

माणसाला त्याच्या आयुष्यात काय पाहिजे तर साध्या भाषेत तो सांगेल, नेम, फेम, मनी ह्या तिन्ही गोष्टी. आणि भारतात या तिन्ही गोष्टी एकत्र मिळतात त्या बॉलिवूडमध्ये. एकदा का बॉलिवूडमध्ये नशीब चमकले की, मग काही पाहायलाच नको. त्याव्यक्तीचे अनुकरण करणे, सोशल मीडियावर त्या व्यक्तीला फॉलो करणे आदी गोष्टी सुरु होतात. मीडियामध्ये जेव्हा त्या व्यक्तीच्या घरातल्या लोकांची नावे यायला लागतात, सोशल मीडियावर त्यांची अकाऊंट तयार होतात तेव्हा त्या कलाकारासोबतच घरातील मंडळी देखील सेलिब्रिटी होतात.

आजच्या या सोशल मीडियाच्या काळात तर स्टार्स पेक्षा स्टार्स किड्सचीच जास्त चर्चा होते. त्यांना सोशल मीडियावर फॉलो केले जाते. त्यामुळे एकप्रकारचे सेलिब्रिटी वलय त्यांना तयार होते. आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांना त्यांच्या कलाकार आई, वडिलांपेक्षा जास्त फॉलो केले जाते किंबहुना त्यांची लोकप्रियता जास्त आहे. चला तर मग पाहूया अशाच काही स्टारकिड्सची नावे.

सुहाना खान :

बॉलिवूडच्या किंग खानची लेक असलेली सुहाना सध्या सर्वात जास्त चर्चित असलेली स्टारकिड आहे. सोशल मीडियावर सुहानाचे लाखो फॉलोवर्स आहे. सुहानाच्या नावाने अनेक फॅन क्लब अकाऊंट तयार असून त्यावर तिचे अनेक फोटो पोस्ट केले जातात. सुहानाने जेव्हा तिचे इंस्टाग्राम अकाऊंट लोकांसाठी ओपन केले तेव्हा खूप मोठा बझ तयार झाला होता. सुहाना सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. तिचे आणि तिच्या परिवारासोबतचे अनेक फोटो ते शेयर करत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

अगस्त्य नंदा :

अमिताभ, जया बच्चन यांचा नातू आणि श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य हा तसा फारसा लाईमलाइट मध्ये नसतो. मात्र तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आह. अगस्त्याने लंडनच्या सेवनोक्स स्कूल मधून शिक्षण घेतले असून तो देखील अमिताभ, अभिषेक सारखाच स्टाइलिश आहे. जेव्हा अगस्त्याने सोशल मीडियावर पदार्पण केले होते, तेव्हा तो खूप चर्चेत आला होता. सुहाना खान आणि अगस्त्य नंदा बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चा करताना दिसतात.

नव्या नवेली :

श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. अनेक फोटो आणि स्टेटस ती पोस्ट करत असते. नव्याला लाखो लोकं फॉलो करतात. नुकतेच नव्याने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट लोकांसाठी ओपन केले आहे.

ख़ुशी कपूर :

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची दुसरी मुलगी ख़ुशी कपूर देखील इतर स्टारकिड्स एवढीच चर्चेत असते. ख़ुशी तिचे आणि बहीण जान्हवी कपूरचे सोबत तयार केलेले अनेक मजेदार व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्राप्त बातम्यांनुसार ख़ुशी देखील जान्हवी प्रमाणे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

हे देखील वाचा