Friday, March 29, 2024

सुकेश चंद्रशेखर त्याची जोडीदार पिंकी ईराणी मार्फत करायचा अभिनेत्रींशी संपर्क, जॅकलिन आणि नोराचा खुलासा

मागील काही महिन्यांपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही सतत प्रकाशझोतात आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्डरिंग केसमध्ये या दोघींची नाव आले असल्यामुळे या सतत बातम्यांमध्ये येत आहे. नुकतेच जॅकलिन आणि नोराने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात त्यांची साक्ष नोंदवली आहे. या दोघींनी कोर्टात त्यांचे दिलेले स्टेटमेंट आता समोर आले आहेत. नोरा आणि जॅकलिन यांनी त्यांच्या स्टेट्मेंट्मधे सांगितले आहे की, सुरेश त्यांना लालच देऊन जाळयात ओढायचा प्रयत्न करायचा.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नोराने तिच्या स्टेटमेंट मध्ये सांगितले आहे की, सुरेश त्याची साथीदार असणाऱ्या पिंकीच्या मार्फत असे लालच देऊन जाळ्यात ओढायचे काम करायचा. नोराने सांगितले की, सुकेशने तिला त्याची गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. याबदल्यात त्याने तिला मोठे, महागडे आलिशान घर आणि तिला महागडी लक्झरी लाइफस्टाइल देण्याचे लालच दिले होते. सुकेश त्याचे म्हणणे पिंकी इराणींच्या मार्फत नोरापर्यंत पोहचवायचा. नोरा कधीच सुकेशला भेटली नाही, आणि ना ही तिला त्याच्या अशा धंद्याबद्दल माहिती होती. नोराने यावेळी असाही दावा केला की, तिने ईडी ऑफिसमध्येच सुकेशला पहिल्यांदा पहिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तर जॅकलिनने देखील तिच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले आहे की, सुकेशने तिलाही आलिशान आणि चैनीच्या लाइफस्टाइल देण्याचे लालच दिले. तिने हे देखील सांगितले की, जॅकलिनच्या मेकअप आर्टिस्टला संपर्क करून पिंकीने विश्वासात घेतले होते. तिने हे देखील सांगितले की, सुकेशने तिला तो सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगितले होते. यासोबतच पिंकीने तिला सांगितले की, सुकेशकडे अनेक प्रोजेक्ट्स आहे, ज्यात त्याला जॅकलिन अभिनेत्री म्हणून पाहिजे.

जॅकलिनने पुढे सांगितले की, सुकेश तिला कॉल आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधायचा. त्याने बोलताना कधीही असे जाणवू दिले नाही की तो चोर आहे. जॅकलिन जेव्हा केरळला गेली होती तेव्हा सुकेशने त्याचे प्रायव्हेट जेट तिला दिले होते. सोबतच त्याच्या हेलिकॉफ्टरची राईड देखील घडवली होती. जॅकलिनने सांगितले की, ती त्याला केवळ दोनदाच भेटली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकता कपूर लवकरच तिच्या खास अंदाजमध्ये करणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा?

‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी

हे देखील वाचा