बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपये मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सतत चर्चेत राहतात. असे असतानाही एकामागून एक नवीन अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी नोरा फतेहीने दावा केला होता की, सुकेशने तिला आपली गर्लफ्रेंड बनवून लक्झरी लाइफस्टाइल देण्याचे वचन दिले होते. या प्रकरणात आता सुकेश चंद्रशेखर याने आपले जाब नाेंदवला आहे.
माध्यमातील वृतानुसार, सुकेश (sukesh chandrasekhar) याचे म्हणणे आहे की, ‘त्याने मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी नोराला पैसे दिले हाेते.’ सुकेश म्हणाला, “आज ती मला घर देण्याचे वचन देत आहे, परंतु तिने मोरोक्कोमधील कॅसाब्लांका येथे तिच्या कुटुंबासाठी घर घेण्यासाठी माझ्याकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र, आता ती स्वत:ला वाचवण्यासाठी हे जाळं विणत आहे.”
सुकेश पुढे म्हणाला, ‘आता नोरा म्हणत आहे की, तिला कार नको होती’, पण हे सर्वात मोठे खोटे आहे. तिला तिची कार बदलायची होती त्यामुळे तिने माझ्याकडे एका कारची मागणी केली आणि मी तिला ती कार भेट दिली.’ सुकेश पुढे म्हणाला की, “मी ईडीला याचे पुरावे आधीच दिले आहेत.” सुकेशने असेही सांगितले की, ‘त्याच्याकडे नोरासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स होते, तरीदेखील त्याला तिला रेंज रोव्हर कार द्यायची होती, पण त्यावेळी कार स्टॉकमध्ये नव्हती आणि तिला लगेच कार हवी होती. ज्यामुळे मी तिला बीएमडब्ल्यूची एस सीरिज भेट दिली. ती कार तिने बराच वेळ वापरली.’
वाहन घेण्याबाबत सुकेशने असेही सांगितले की, नोरा ही भारताची रहिवासी नाही, म्हणून तिने हे वाहन आपल्या खास फ्रेंडचा पती बॉबीच्या नावावर नोंदवण्यास सांगितले होते. सुकेशचा असाही दावा आहे की, जेव्हा तो जॅकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा नोरा त्याला जॅकलिनला सोडून जाण्यास सांगायची.(sukesh chandrasekhar opened secrets about bollywood actress nora fatehi said actress took huge amount to buy house for family)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पटाका कुडी’ गाण्यावर थिरकली रकुल अन् शहनाज, पाहा व्हिडिओ
हाय हाय फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिवशीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, क्रिएटिव्हिटीला मिळाली दाद