Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात रोज नवे ट्विस्ट येत आहेत. तुरुंगात बंद सुकेश चंद्रशेखर कधी नोरा फतेही तर कधी चाहत खन्नाला पत्र लिहून टार्गेट करत आहे. यापूर्वी चाहत खन्ना हिने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आपले बयाण नोंदवले होते आणि सुकेशने तिहार तुरुंगात तिला प्रपोज केल्याचे सांगितले होते. त्याचवेळी आता सुकेशने एक पत्र लिहिले आहे, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

चाहत खन्ना (chahatt khanna) हिने प्रपाेजचा दावा करत सांगितले हाेती की, ‘ती तिहारमध्ये सुकेशला भेटल्यानंतर त्याच्या जाळ्यात फसली, जेव्हा सुकेशने तिच्यासमोर गुडघे टेकून लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.’ या प्रस्तावावर अभिनेत्री म्हणाली की, ‘ती आधीच विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे’, तेव्हा सुकेशने तिच्या पतीला योग्य माणूस नाही असे म्हटले. अभिनेत्रीने सांगितले की, ‘ईडीकडून समन्स मिळाल्यानंतरच तिला कळले की, सुकेश हा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा पुतण्या नाही.’

त्याचवेळी आता मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश (sukesh chandrashekhar) याने एक पत्र लिहून दावा केला आहे की, ‘त्याने तिहारमध्ये चाहत खन्ना यांना कधीही प्रपोज केले नाही.’ सुकेश म्हणाला, “मला आधीच विवाहित आणि दोन मुले असलेल्या महिलेला डेट करण्यात काहीही रस नाही. मी चाहतसारखा गोल्ड डिगर नाही. चाहत आणि निक्कीसोबत माझे फक्त व्यावसायिक संबंध होते, त्यासंदर्भात मीटिंग झाली आणि त्यासाठी त्यांना एडवांस रक्कमही देण्यात आली.”

पुढे सुकेशने लिहिले, “चाहत म्हणते की, ‘तिला माहित नव्हते की, ती तिहारमध्ये आहे.’ 10 वर्षाच्या मुलीलाही जेल कसा असतो हे कळेल. पिंकी हिने तिची फसवणूक केल्याचा तिचा दावा आहे, त्यामुळे मला विचारायचे आहे की, ज्या अभिनेत्रीने इतके प्रोजेक्ट केले आहेत ती कोणावर आंधळा विश्वास ठेवून दिल्लीत कशी काय येऊ शकते. तेही तिहार तुरुंगात एकटेच? ती खोटी आहे. यावरून तिने आता कोणत्या प्रकारच्या स्टाेरी बनवल्या आहेत हे दिसून येते. ती तिहारला आली होती आणि मी तीला फोन करत होतो, असा तिचा दावा असेल तर 2018 पासून तिने इतर कोणालाही किंवा पोलिसांना का कळवले नाही? ही गोष्ट आजवर लपवून का ठेवलीस?” असे सुकेशचे म्हणणे आहे.

चाहत खन्ना हिच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिला टिव्ही मालिका ‘बडे अच्छे लगते है’ यातून खरी ओळख मिळाली.(sukesh chandrashekhar claims that he never proposed to tv actress chahatt khanna said i am not a gold digger like her )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

हे देखील वाचा