Monday, July 1, 2024

‘पुन्हा प्रेमात पडलो…’, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेशने जॅकलीनला लिहिले आणखी एक पत्र

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर अनेकदा चर्चेत असतो. शेवटच्या वेळी सुकेशने इस्टरच्या दिवशी जेलमधून पत्र लिहून जॅकलीनची आठवण काढली हाेती. अशात आता पुन्हा एकदा सुकेशने जेलमधून जॅकलिनला पत्र लिहून तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज प्लॅनिंग केले असल्याचे सांगितले जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया..

माध्यमातील वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrashekhar) यानी त्यांची लव लेडी जॅकलिन (Jacqueline Fernandez) हिच्यासाठी पुन्हा एकदा प्रेमपत्र लिहिले आहे. सुकेशने या पत्रात जॅकलिनचे कौतुक केले आहे. सुकेश या पत्राची सुरुवात माय लव्ह, माय बेबी जॅकलिनने करतो. सुकेशने पुढे लिहिले की, ‘त्याने जॅकलीनला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पाहिले, तिचा परफॉर्मन्स, तिचा डान्स हे सर्व खूप क्लासी, एलिगंट, सुपर हॉट होते. त्यामुळे तो पुन्हा एकदा जॅकलिनच्या प्रेमात पडला आहे.’

सुकेशने या पत्रात जॅकलीनला एक सुपर सरप्राईज देण्याबाबतही सांगितले आहे आणि हे सरप्राईज पाहिल्यानंतर तिला खूप आनंदही होईल असेही त्याचे म्हणणे आहे. याशिवाय सुकेशने असेही लिहिले की, ‘त्याच्या आयुष्यात लेडी लव्ह आल्याने तो खूप आनंदी आहे आणि तिची ताे नियमित आठवणही काढताे.’ सुकेशने पुढे सांगितले की, ‘त्याला फक्त जॅकलीनला आनंदी ठेवायचे आहे.’

 11 ऑगस्टला साजरा करणार जॅकलीन तिचा वाढिदवस
सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘त्याचे जॅकलीनवर खूप प्रेम आहे आणि जॅकलीनवरील प्रेमासाठी त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. तो तिच्यावर खूप विश्वास ठेवतो.’ सुकेशने हे पत्र अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त लिहिले आहे.(sukesh chandrashekhar writes a letter to actress jacqueline promises to give her a super surprise on her birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणी यांचा 25 वर्ष जुना ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; माॅडेलिंग करिअर येणार हाेते संपुष्टात

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शीझान खानला कास्ट केल्यामुळे संतापली तुनिषा शर्माची आई, चॅनला पाठवली कायदेशीर नोटीस

हे देखील वाचा