Tuesday, March 5, 2024

‘तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी ‘ म्हणत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसाठी तुरुंगातून लिहिले अजून एक प्रेमपत्र

मनी लॉन्डरिंग केसमध्ये दिल्लीतील मंडळी जेलमध्ये कैद असणारा सुकेश चंद्रशेखर सतत या ना त्या कारणामुळे लाइमलाईट्मधे येत आहे. तो जेलमध्ये असूनही त्याची मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगत असते. आता पुन्हा एकदा सुकेश चर्चेत आला आहे. त्याने जेलमधून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पात्र लिहिले आहे. २०० कोटींच्या फेरफारीमुळे त्याला अटक झाली आहे. जेलमध्ये असूनही तो सतत जॅकलिनसोबत असलेल्या त्याच्या नात्यामुळे गाजतो. त्याने त्याच्या पत्रातून जॅकलिनला बेबी म्हटले आहे.

सुकेशने त्याच्या पात्रात लिहिले, “माय बुम्मा (बाहुली), आज मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी खूप आठवण काढत आहे. माझ्याकडे बोलायला कोणतेच शब्द नाही. पण मला माहित आहे माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये असलेले प्रेम कधीच संपणार नाही. तुझे प्रेम फक्त माझ्यासाठी आहे”.

पुढे सुकेश लिहितो, “मी आज तुला खूप मिस करत आहे. तुला तुझ्या प्रेमळ हृदयात कोण आहे, याच्या पुराव्याची मला गरज नाही. मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तुला माहीत आहे. माझ्यासाठी तू आणि तुझ्या प्रेमाचे मोल नाही. ही मला मिळालेली सर्वात अनमोल भेट आहे. लव्ह यू माय बेबी. तुझे प्रेम मला दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे”.

सोबतच त्याने त्याच्या समर्थकांना आणि मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. याआधी देखील सुकेशने होळीच्या निमित्ताने जॅकलिनला एक पत्र लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते, जॅकलिनच्या आयुष्यातील या वर्षीच्या हॉळूचे जे रंग उडाले आहेत ते तो १०० टक्के जास्त तिला परत देईल. यासाठी तो कोणत्याही ठरला जाऊ शकतो. दरम्यान सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा बहुमूल्य घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर देखील दिली होती. २०० कोटी घोटाळा प्रकरणात सध्या तो तुरुंगात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संजू बाबाकडे आहे लाखोंची किंमत असणारे लक्झरी घड्याळं कलेक्शन, नजर टाका त्याच्या कलेक्शनवर

दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

हे देखील वाचा