Saturday, June 29, 2024

रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेता कार्ती या दिवसात त्याच्या आगामी चित्रपट ‘सुल्तान’ मध्ये खूपच व्यस्त असताना दिसत आहे. ॲक्शन ड्रामा असलेला सुल्तान हा एक तमिळ चित्रपट आहे. बक्कीराज कन्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या ॲक्शन चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 2 मिनिट 46 सेकंदाचा हा ट्रेलर आहे. यामध्ये रश्मिका मंदानासोबत कार्तीचा रोमँटिक सीन दिसला आहे, तर दुसरीकडे जबरदस्त फाईट दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

सुल्तान या चित्रपटाचा ट्रेलर बघून प्रत्येकाचे अंगावर शहारे उभारले असतील. या ट्रेलरमध्ये कार्ती एका सैनिकासारखा 100 मजबूत पुरुषांचे नेतृत्त्व करताना दिसत आहे. कधी तो त्याच्या टीमसोबत मजा मस्ती करताना दिसतो, तर दुसरीकडे तो एखादया लढाईचा भाग बनतो. कार्ती कुठेही जाईल तो त्याच्या 100 पुरुषांच्या टीमला सोबत घेऊनच जात असतो.

या ट्रेलरमध्ये‌ डायलॉग आणि कमालीची ॲक्शन दिसून आली आहे. यामधील कार्ती आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले केले आहे. या चित्रपटात कार्ती एका मजबूत पुरुषाची भूमिका निभावताना दिसणार आहे. परंतु रश्मिका समोर तो नेहमीच घाबरलेला असतो. ट्रेलरमध्ये जेव्हा रश्मिका त्याला शेड्स काढायला सांगते, तेव्हा तो लगेच काढतो.

एकूणच या चित्रपटात ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि दमदार डायलॉग यांचा जोरदार तडका पाहायला मिळणार आहे. ट्रेलरने सगळ्यांच्या मनात चित्रपटाबाबत आकर्षण निर्माण केले आहे. सगळेजण आता फक्त हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर तमिळ भाषेत प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला 24 तासात 25 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वजण कार्ती आणि रश्मिकाचे कौतुक करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! ‘५२ गज का दामन’ गाण्यावर ‘शालू’ने लावले जोरदार ठुमके, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

-अभिनेत्रीच्या लोकप्रियतेने गाठले शिखर! इंस्टाग्रामवर ओलांडला ६ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा, व्हिडिओ शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-नीतू कपूर यांनी केला ऋषी कपूर यांच्यासोबतचा न्यूयॉर्कचा व्हिडिओ शेअर, एकदा तुम्हीही घ्या पाहून

हे देखील वाचा