Monday, February 24, 2025
Home मराठी ‘मला एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच वाटते’, सुमित राघवनने केले मुंबई मेट्रोबद्दल ट्विट

‘मला एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच वाटते’, सुमित राघवनने केले मुंबई मेट्रोबद्दल ट्विट

सुमित राघवन मराठीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुमितने आतापर्यंत अतिशय मोजके आणि सर्वोत्तम काम केले आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो अतिशय हुशार आणि खुमासदार सूत्रसंचालक आहे. सुमित नेहमीच चालू घडामोडींवर त्याचे मत मांडत असतो. अतिशय हुशार, अभ्यासू आणि विश्लेषक व्यक्तिमत्व म्हणून त्याला इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्या फॅन्समध्ये ओळखले जाते. सुमित सोशल मीडियावरही तुफान सक्रिय आहे. तो सतत आजूबाजूच्या घडामोडींबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना दिसतो. नुकतेच त्याने मुंबईतील नव्याने सुरु झालेल्या मेट्रो लाईनवरून प्रवास केला आणि याबद्दल ट्विट केले.

सुमित राघवनने त्याच्या ट्विटमध्ये मुंबई मेट्रोचे फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले असून, सोबत कॅप्शनमध्ये लिहिले, “गणपती बाप्पा मोरया. मला मी एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्यासारखेच वाटत आहे. मुंबईकरांसाठी हे सर्वात चांगले गिफ्ट आहे. धन्यवाद देवेंद्र फडणवीस”. असे लिहीत, ‘मेट्रो मॅन देवेंद्र’ आणि ‘मुंबई मेट्रो झिंदाबाद’ असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. सुमितचे हे ट्विट चांगलेच गाजत असून, अनेकांनी त्याचे ट्विट हे रिट्विट केले असून, काहींनी त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

सुमितने नुकताच गुंदवली ते अंधेरी पश्चिम या नवीन झालेल्या मेट्रोमधून प्रवास केला. त्याचा हा प्रवास नक्कीच त्याला आवडल्याचे दिसत आहे. कारण त्याने याबद्दल एक ट्विट करत स्वतःचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मेट्रो रिकामी दिसली. तत्पूर्वी सध्या सुमित ‘वागले की दुनिया’ या मालिकेत काम करत असून, तो काही सिनेमांमध्ये दिसत असतो. मागच्यावर्षी त्याचा ‘एकदा काय झालं’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून सुमितला अमाप लोकप्रियता मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’

हे देखील वाचा