Tuesday, July 9, 2024

‘ससुराल सिमर का २’ मालिकेला येणार नवे वळण, होणार ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का 2’ प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मालिकेत सिमर आणि आरवच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. आता मालिकेत नव्या कलाकाराच्या एन्ट्रीने मालिका आणखीनच रंगतदार होणार आहे. लवकरच मालिकेत सुमित भारद्वाजची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

लोकप्रिय हिंदी मालिका ‘ससुराल सिमर का 2’ मध्ये सध्या सिमर आणि आरवचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले असून लग्न झाल्याने खूपच खुश आहेत.

‘ससुराल सिमर का 2’ मालिकेत सुमित समर खन्ना नावाच्या एका मोठ्या संगीतकाराची भूमिका साकारणार आहे. मालिकेत येणार्‍या नव्या वळणानुसार आरव लवकरच समरला सिमरच्या गाण्याचा अल्बम बनवण्यासाठी सांगणार आहे. मोठ्या प्रतिष्ठित संगीतकारांबरोबर काम केलेल्या समरला सिमरच्या क्षमतेचा अजिबात अंदाज नाही, तरीही तो तिच्यासोबत काम करायचे ठरवतो आणि तिला भेटतो. याचदरम्यान सिमरच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे, जे पाहून प्रेक्षकसुद्धा चकित होणार आहेत.

मालिकेतील या भूमिकेविषयी बोलताना अभिनेता सुमित भारद्वाज म्हणाला की, “क्वारंटाइन नंतर आलेल्या निराशेनंतर माझ्या प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी काहीतरी चांगले करण्याची माझी इच्छा होती. पुन्हा पडद्यावर परतण्यासाठी आतुर होतो. त्यामुळे मी काम करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नव्हतो. म्हणूनच मी माझ्या पुनरागमनासाठी या दर्जेदार मालिकेतील धमाल आणि उत्साही भूमिकेची निवड केली. ही भूमिका मला आणि माझ्यातील सामर्थ्याला नवीन दिशा देईल. कारण याबरोबर मी स्वतःला अजून चांगला घडवू शकेल. समर खन्नाची ही भूमिका खूपच मिळती जुळती असून मी ती उत्तमप्रकारे करेल.”

आता सुमित भारद्वाजच्या एन्ट्रीसाठी  प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋतिक रोशनकडून ‘विक्रम वेधा’च्या ऍक्शन टीमला खास गिफ्ट; आपली परंपरा ठेवली अबाधित

-‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…, म्हणत ‘या’ अभिनेत्री सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा