Wednesday, June 26, 2024

काजोलची वहिणी बनणार ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुमोना चक्रवर्ती?

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) काजोलच्या (Kajol) कुटुंबाची सून होणार आहे. हे वृत्त कानावर येताच, सुमोनाने आता या बातमीमागील सत्य सांगितले आहे. हे सत्य जाणून चाहत्यांनाही आश्चर्य वाटेल. 

सम्राट मुखर्जीसोबत जोडले गेलं सुमोना चक्रवर्तीचं नाव
सुमोना चक्रवर्तीचं नाव बंगाली अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत (Samrat Mukerji) जोडलं जात आहे. दरम्यान, सुमोना लवकरच सम्राटसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. खरं तर, सम्राट दुसरा कोणी नसून काजोल, तनिषा मुखर्जी (Tanisha Mukerji), राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांचा चुलत भाऊ आहे. (sumona chakravarti break silence on wedding with actress kajol cousin brother samrat mukerji)

सुमोनाने मौन तोडले
या बातम्या व्हायरल होताच सुमोना चक्रवर्तीने मौन तोडले. वृत्तसंस्थेशी बोलताना सुमोना म्हणाली, “या सर्व बातम्या १० वर्षे जुन्या आहेत, ज्या सोशल मीडियावर फिरत आहेत. हे सर्व बकवास आहे. सध्या तरी मला याच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. तसेच मला कमेंटही करायची नाही. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. अजून काही असेल, तर तुम्हाला नक्की कळेल. मी स्वतः याबद्दल सांगेन.”

फक्त मैत्री आहे
यानंतर जेव्हा सुमोनाला संवादात विचारण्यात आले की, सम्राट मुखर्जी तुझ्या आयुष्याचा भाग आहे का? उत्तरात सुमोना म्हणाली की, “तो माझा फक्त मित्र आहे. यापेक्षा अधिक काही नाही. मला माझ्या मित्र-परिवाराबद्दल मीडियाशी बोलणे आवडत नाही. लग्नाबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे.”

कपिल शर्मा शो सोडण्याच्या अफवा पसरल्या आहेत
यापूर्वी तिने ‘द कपिल शर्मा शो’ सोडल्याची अफवा उडाली होती. मात्र, सुमोनाने यावर वक्तव्य करत या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते.  रिपोर्टनुसार, सुमोना चक्रवर्ती शो सोडत नाहीये. अभिनेत्री म्हणाली, “मी हा शो अजिबात सोडणार नाही आणि मी असं काही करण्याचा विचारही करत नाहीये.” सध्या हा शो काही काळासाठी बंद आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा