Monday, September 25, 2023

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

कर्लस मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रमिती नरके हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री प्रमितीचे वडिल आणि ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

महात्मा फुले यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून हरी नरके यांना ओळखले जात होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आवाज उठवला. त्यांच्या निधनाने राज्यातील पुरोगामी चळवळीला मोठी फटका बसला आहे. त्यांनी लेखनाच्या आणि भाषणाच्या माध्यमातून शाहू, फुले ,आंबेडकर यांच्या विचारांना समाजामध्ये पोहोचवण्याचे काम मोठ्या मेहनतीने केले. त्यांनी ५६ पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलेले आहे.

राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र महात्मा फुले या पुस्तकांचा संपादनही हरी नरके यांनी केली होती. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाशित केलेल्या समग्र वाङ्मयातील २६ खंडापैकी ६ खंडाचे संपादन केले होते. या आठवड्यातच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र त्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य आणि पुरोगामी चळवळीला मोठी हानी पोहोचली आहे. त्यांच्या निधनाने साहित्य, शिक्षण, राजकीय अशा अनेक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

अभिनेत्री प्रमिती नरके विषयी बोलायच झाले तर, प्रमितीला अभिनयात करिअर करण्याबाबत सुरुवातीला घरच्यांचा विरोध केला गेला. तिला पहिल्यादा ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतील अवली हे मुख्य पात्र साकारायला मिळालं. या मालिकेनंतर तिनं नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. ‘तोडी मिल फँटसी’ या नाटकासाठी तिने काम केले. (Sundara Mana Bharli fame actress Pramiti Narke father senior writer Prof. Death of Hari Narke)

अधिक वाचा- 
काळजाला चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
जेव्हा तमन्ना नेसते साडी! अभिनेत्रीचा लूक पाहून प्रेमातच पडाल

हे देखील वाचा