Thursday, September 28, 2023

काळजाला चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कलाविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. 2011साली रिलीज झालेल्या सलमान खान अभिनित ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 63व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनावर चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी सिद्दिकी यांच्यावर न्यूमोनिया आणि यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. सिद्दीक यांना त्यांच्या आजारपणानंतर एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) मशीनच्या आधारावर ठेवण्यात आले होते. 8 ऑगस्ट रोजी एक वैद्यकीय मंडळ सिद्दीकच्या प्रकृतीचे मूल्यांकन करून पुढील कारवाई ठरवणार होते. त्यांच्या निधनाने दक्षिणेसह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

सिद्दीकी यांनी 1989 मध्ये ‘रामजी राव स्पीकिंग’ या मल्याळम चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 1986 मध्ये ‘पप्पन प्रियापेट्टा पप्पन’ या मल्याळम चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथा लेखक म्हणून पदार्पण केले. मोठ्या पडद्यावर आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट ‘बिग ब्रदर’ होता. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सिद्दीकी यांनी सलमान खानचा ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटचे दिग्दर्शन केला आहे. हा चित्रपट 2011 साली आला होता. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने तिकीट खिडकीवर 148.86 कोटींची कमाई केली. दिग्दर्शनासोबतच सिद्दीकीने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 2022 मध्ये तो ‘केनकेमम’ या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसला होता. (Salman Khan starrer ‘Bodyguard’ director Siddiqui has passed away)

अधिक वाचा –
‘मी काहीच विसरले नाही, मी अखेरची मुघल आहे…’, आशा भोसलेंच्या विधानाने वेधले सर्वांचे लक्ष
‘थलायवा’साठी काहीही! सिनेमाच्या रिलीज डेटदिवशी ‘या’ 2 शहरात कंपन्यांना सुट्ट्या, कंपनीनेच वाटली तिकीटे

हे देखील वाचा