Saturday, June 29, 2024

अहान शेट्टीची गर्लफ्रेंड आहे खूपच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय तिचीच चर्चा

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याने ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या या चित्रपटाने बॉस ऑफिसवर चांगलाच गल्ला केला आहे. अहान शेट्टीच्या या चित्रपटाची बुधवारी (१‌ डिसेंबर) रोजी स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. जिथे त्याची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ देखील आली होती. तान्या तिच्या सुंदर फोटोमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती एक मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तसेच तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे.

अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफला पाहून आता त्याचे चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, तान्या श्रॉफ नक्की कोण आहे आणि ती काय करते? तान्याने २०१५ साली मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे. तिचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक जयदेव श्रॉफ हे आहेत. (Suniel shetty son ahan shetty girlfriend to Tania Shroff glamorous lifestyle photo goes viral)

माध्यमातील वृत्तानुसार, अहान शेट्टी आणि तान्या शाळेत असल्यापासूनच एकमेकांना ओळखतात. ती सध्या लंडनमध्ये राहते. इंस्टाग्रामवर तिला ८७ हजारापेक्षाही जास्त लोक फॉलो करतात. अहान आणि तान्याचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुनील शेट्टीने त्याच्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. ‘तडप’ हा चित्रपट जगभरात १६०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सर्वत्र चर्चा चालू होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अहान त्याच्या करिअरमध्ये खूप प्रगती करेल असा अंदाज सगळेजण बांधत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा