Wednesday, December 4, 2024
Home वेबसिरीज अण्णाची ओटीटीवर दमदार एन्ट्री! ‘धारावी बॅंक’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

अण्णाची ओटीटीवर दमदार एन्ट्री! ‘धारावी बॅंक’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

एम एक्स प्लेअरवर भौकाल, आश्रम आणि रक्तांचल सारख्या वेबसिरीज नंतर आता एक नवीन वेबसिरीज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या नवीन वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. या वेबसीरिजमध्ये विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यांची दमदार अभिनय करत असलेले कलाकार आहेत. या टिझरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ही वेबसिरिज आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेली धारावीवर आधारित आहे.

एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या मूळ मालिकेचा टीझरमध्ये धमाकेदार दृश्यांनी सुरुवात होते. त्याची सुरुवात अण्णांच्या म्हणजेच सुनील शेट्टीच्या जबरदस्त झलक पाहायला मिळते. अभिनेता विवेक ओबेरॉय देखील पोलिस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये बाईकवरून एन्ट्री घेताना खूप डॅशिंग दिसत आहे. वेब सीरिजमध्ये दोघेही एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.या सीरिजमध्ये अभिनेता सुनील शेट्टी ‘डॉन’च्या लूकमध्ये दिसणार आहे. तर, याच सीरिजमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावताना दिसणार आहे. या सिरीजमध्ये सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय एकमेकांसमोर दिसणार आहेत. या सिरीजमध्ये या दोघांमध्ये होणाऱ्या रंजक आणि थरारक घटना हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

‘धारावी बँक’ ही एक गँगस्टर ड्रामा सीरिज आहे. यात सुनील शेट्टी धारावीचा डॉन ‘थलायवन’ची भूमिका करताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी सुनीलने साऊथ स्टाईल गेटअप केला आहे. पांढरा शर्ट, लुंगी, लांब केस आणि दाढीमध्ये सुनील एकदम हटके दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय जेसीपी जयंत गावस्कर हे पात्र साकारताना दिसणार आहे. या टीझरमधून या दोन पात्रांमधील संघर्ष दिसत आहे. सोनाली कुलकर्णी, ल्यूक केनी, फ्रेडी दारूवाला, शांतीप्रिया यांच्याही या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहेत.

‘धारावी बँक’ झी स्टुडिओज निर्मित आहे आणि दिग्दर्शक समित कक्कर दिग्दर्शित आहे. सध्या निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. पण टीझरमुळे लवकरच त्याचा ट्रेलर रिलीज होईल आणि या महिन्याच्या अखेरीस वेब सीरिजही प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बेबी कपूर’चे आगमन! गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात आलिया भट्ट दाखल

पुनीत इस्सर सोबत जेवू नकोस म्हणत ‘या’ अभिनेत्रीला एका महिलेने केले होते सावध!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा