Tuesday, July 9, 2024

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आशेचा किरण! सुनील शेट्टीचा नवा उपक्रम ‘दवा भी दुआ भी’, देणार ‘ही’ सेवा मोफत

दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या एका अदृश्य विषाणूसोबत लढत आहोत. या विषाणूमुळे जगात असंख्य लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. या महामारीच्या काळात औषधं, ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे भयानक परिस्थिती तयार झाली आहे. अशा काळात अनेक सामाजिक संस्था, अनेक कलाकार पुढे आले आहेत. आता या यादीत अजून एक नाव सामील झाले आहे.

कोरोनाकाळात लोकांना औषधं मिळावे यासाठी सुनील शेट्टीने ‘दवा भी, दुआ भी’ हा नवा उपक्रम सुरु केला आहे. याची घोषणा त्याने नुकतीच सोशल मीडियावर केली. या उपक्रमांतर्गत लोकांना मोफत औषधं मिळणार आहेत. ही औषधं बीडीआर फार्मास्यूटिकल्सकडून वाटप होणार आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओ सुनीलने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

सुनीलने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, “समाजापेक्षा कोणतीही ताकद सर्वात मोठी नाही. मी ‘दवा भी, दुआ भी’ या उपक्रमाचा भाग बनून खूप खुश आहे. आम्ही या अनुषंगाने गरजू लोकांना शक्य होईल तेवढी मदत करू शकतो. आज आपण अतिशय कठीण काळात जगत आहोत. या काळात सर्वाना प्रार्थना आणि औषधांची खूप गरज आहे. मी बीडीआर फार्मास्युटिकल्सच्या सहयोगाने आम्ही ‘दवा भी दुआ भी’ हा उपक्रम सादर करत आहोत.”

याबद्दल अधिक माहिती देताना सुनील पुढे म्हणाला, “जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला औषधांची गरज असेल किंवा औषधं खरेदी करण्यासाठी अडचण येत असेल, तर काळजी करू नका. मी आणि बीडीआर फार्मास्यूटिकल्स ती सर्व औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ही वेळ एक दुसऱ्याची मदत करण्याची आहे.”

याआधी देखील सुनील फ्री ऑक्‍सिजन कंसंट्रेटर्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्शील होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा