हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेा म्हणजे सुनील शेट्टी होय. त्याने आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. अशामध्ये आता त्याचा मुलगा अहान शेट्टी हा देखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तो ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Suniel Shetty’s son will enter in film industry from Tadap film)
‘तडप’ हा चित्रपट यावर्षी 24 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अनेक बॉलिवूड कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. अहान हा चित्रपटसृष्टीत नवीन असणार आहे. त्यामुळे सगळेच उत्सुक आहेत. अशातच अहान शेट्टीबाबत एक बातमी समोर आली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच अहानकडे आणखी एका चित्रपटाची ऑफर आली आहे. यामध्ये तो अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. साजिद नाडियाडवाला हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या प्रोजेक्टवर आता काम चालू आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती समोर येण्याची आता दर्शक वाट पाहत आहेत. अहान हा त्याच्या वडिलांसारखाच दिसतो. तसेच त्याच्या अनेक सवयी देखील सुनील शेट्टीप्रमाणे आहेत.
अहानने 25 वर्षापर्यंत त्याचे शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले आहे. त्यानंतर तो पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता. सुनील शेट्टीला बॉलिवूडमधील ‘यारों का यार’ मानले जाते. त्याच्या वडिलांप्रमाणेच अहानची देखील खूप लवकर सगळ्यांची मैत्री होते. रणबीर कपूर, डीनो मोरिया, अपारशक्ती खुराना हे अहानचे खास मित्र आहेत. तो सुनील शेट्टीसारखा तर दिसतोच, पण त्याचे चालणे देखील त्याच्या प्रमाणेच आहे.
अहान शेट्टी हा एक उत्कृष्ट फुटबॉलर आहे. शाळेत असताना तो त्याच्या फुटबॉल टीमचा कर्णधार होता. तो अनेकवेळा रणबीर कपूर आणि डीनो मोरियोसोबत फुटबॉल खेळताना दिसतो. सुनील शेट्टीला देखील स्पोर्ट्समध्ये खूप रस आहे. अहानला फुटबॉल खेळण्याची पहिली ट्रेनिंग त्याचे वडील सुनील शेट्टीनेच दिली होती. सुनील लहानपणापासूनच अहानसोबत फुटबॉल खेळतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी
-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद