Tuesday, June 18, 2024

डॉक्टरांनी सोडली होती आशा, मात्र सुनील दत्त यांचा नर्गिसवरील प्रेमावर होता विश्वास

बॉलिवूडमध्ये जोड्या जुळणं – तुटणं याच्या चर्चा नेहमीच चालू असते. अनेकांचे संसार तर अर्ध्यावरच मोडतात आणि ते घटस्पोटही घेतात. पण एक जोडी अशी आहे, जी त्यांच्या प्रेमासाठी ओळखली जाते, ती जोडी म्हणजे सुनील दत्त (sunil dutt) आणि नर्गिस दत्त. (nurgis dutt) या दोघांचे अनेक किस्से देखील लोकप्रिय आहे. असाच एक किस्सा म्हणजे नर्गिस यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुनील यांनी त्यांची साथ आणि आशा सोडली नव्हती. 

जसं की जवळपास सर्वांनाच माहित आहे, सुनील दत्त यांनी आगीत अडकलेल्या नर्गिस यांना वाचवले होते. याच घटनेनंतर त्यांच्यात प्रेम फुलण्यास सुरुवात झाली होती. त्याचे झाले असे की, १९५७ साली मदर इंडिया चित्रपट आला होता. हा चित्रपट खूप गाजला होता. अगदी या चित्रपटाला ऑस्करचे नॉमिनेशनही मिळाले होते. याच चित्रपटाच्या शूटमध्ये एक भयंकर घटना घडली होती. या चित्रपटात नर्सिग यांची प्रमुख भूमिका होती, तर सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची बिरजूची भूमिका निभावली होती. तर झाले असे की चित्रपटाच्या शूटवेळी सेटवर आग लागली आणि त्यात नर्गिस आडकल्या होत्या. त्यावेळी सुनील दत्त यांनी त्या आगीतून नर्गिस यांची सुटका करत त्यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर दोघांनाही थोड्या जखमा झालेल्या. पण यामुळेच ते एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी १९५८ मध्ये लग्न केले.

पुढे या दोघांना एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. त्यांचा मुलगा म्हणजेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त. तर सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा संसार एकदम सुखात सुरू होता. पण त्यांना ८० च्या दशकात मोठा धक्का बसला. नर्गिस यांना पॅनक्रेटिक कॅन्सर झाल्याचे समोर आले. त्यांनतर त्यांच्यावरील उपचारास सुरुवात झाली. दत्त कुटुंबासाठी हा सर्वात कठीण काळ होता. सुनील यांनी नर्गिस यांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले. ते खंबीरपणे नर्गिस यांच्या पाठीशी उभे राहिले. पुढे ते त्यांना कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेलाही नर्गिस यांना घेऊन गेले. तिथेची डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण अनेक प्रयत्नांनंतरही त्या कोमात गेल्या. त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर डॉक्टरांनी असा सल्ला दिला की, त्यांचे वेंटिलेटर काढून टाकावे, कारण त्यांच्या वाचण्याच्या शक्यता कमी होत्या. पण सुनील यांनी आशा सोडल्या नाहीत, त्यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला. अखेर त्यांच्या विश्वासाला यश मिळाले आणि ४ महिन्यांनी नर्गिस यांना शुद्ध आली. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला. मग ते १९८१ मध्ये मुंबईतही परत आले. मात्र, अखेर दैवाचा खेळ कोणाला कळत नाही, तस झालं आणि ३ मे १९८१ रोजी युरिन इंन्फेक्शनमुळे नर्गिस यांचे निधन झाले.

या घटनेनंतर दत्त कुटुंबासाठी अनेक गोष्टी बदलल्या. एका मुलाखतीत नर्गिस आणि सुनील यांची मुलगी नम्रता हिने सांगितलेले की सुनील यांनी त्यांना सांगितलेले की नर्गिस या ज्या प्रकारच्या व्यक्ती, त्यानेच त्यांना प्रभावित केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

 

हे देखील वाचा