Friday, June 14, 2024

मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे ३० मे रोजी वयाच्या केवळ ४९ व्या वर्षी निधन झाले आहे. कोचीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार त्यांना मे महिन्याच्या सुरुवातील लिव्हरच्या एका गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मल्याळम इंडस्ट्रीमधील अनेकांनी त्यावर दुःख व्यक्त केले आहे.

हरीश यांचा एक फोटो शेअर करत टोविनो थॉमस यांनी लिहिले, “रेस्ट इन पीस चेट्टा.” यासोबतच हरीश यांच्या फॅन्सने देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हरीश पेंगन यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते. ज्यात महेशिनते प्रथिकारम, मिन्नल मुरली, वेल्लारीपट्टनम, जाने मन, जया जया जया हे, प्रियन ओटमहिल आणि जो एंड जो आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

अभिनेते हरीश पेंगन यांच्या डॉक्टरांनी त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता. त्याची जुळी बहीण डोनर होण्यासाठी देखील तयार झाली होती, मात्र त्यांच्या या ऑपरेशनसाठी लागणार पैसा नव्हता. अभिनेता नंदन उन्नी यांनी याचा थोडा खर्च उचलला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना देखील मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र उपचारासाठी उशीर झाला आणि हरीश यांचे दुःखद निधन झाले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘रामायण’ फेम ‘सीता’चे 33 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत मिळाली दमदार व्यक्तिरेखा

पहचान कौन! बाॅलिवूडच्या ‘या’ सुपर हॉट अभिनेत्रीने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा