Tuesday, March 11, 2025
Home टेलिव्हिजन कशी नशीबाने आज थट्टा मांडली! ‘द कपिल शर्मा शाे’चा स्टार सुनील ग्रोवर चालवताेय रिक्षा

कशी नशीबाने आज थट्टा मांडली! ‘द कपिल शर्मा शाे’चा स्टार सुनील ग्रोवर चालवताेय रिक्षा

काॅमिडिय सुनील ग्रोव्हरला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यानंतर तो कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग बनला नाही. ‘द कपिल शर्मा शो‘ सोडल्यानंतर त्याचे नशीब असे बदलले की तो कधी बटाटे, टोमॅटो तर कधी दूध विकताना दिसतो. अशातच जेव्हा तो ऑटो चालवताना दिसला, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. हे बघून चाहत्यांना असा प्रश्न पडला की, चित्रपटसृष्टीतील एवढ्या प्रसिद्ध आणि टॅलेंटेड अभिनेत्याला कोणी काम का देत नाही? आता त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे का की, त्याला बॅटरी रिक्षा चालवावी लागते?

सुनील ग्रोवर (sunil grover) याच्या चाहत्यांना वाटते की, जर त्याने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला नसता तर त्याला हा दिवस पाहावा लागला नसता. अभिनेत्याला ऑटो चालवताना पाहून असे वाटते की, त्याच्या चित्रपटसृष्टीबद्दल अपेक्षाभंग झाल्या आहेत, जरी त्याला सामान्य लोकांच्या नजरेतून जीवन पहायचे आणि अनुभवायचे आहे. अभिनेत्याच्या लेटेस्ट फोटोंवरून असे दिसते की, त्याला सामान्य लोकांसारखे जगणे आणि त्यांच्याचप्रमाणे वेळ घालवणे आवडते. त्याने लेटेस्ट शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बसा.’

सुनील ग्रोवरची ही पाेस्ट पाहून एका युजरने लिहिले की, ‘कपिल शर्मा शोमध्ये तो थांबला असता तर त्याला रिक्षा चालवावी लागली नसती.’, तर दुसरा युजर त्याची खिल्ली उडवत म्हणतो, ‘भाऊ, ऑनलाइन पैसे भरले तर चालेल का?, तुम्ही क्यूआर कोड टाकला आहे का?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील ग्राेव्हरच्या वर्कफ्रंट बद्दल बाेलायचे झाले, तर ताे अखेरचा ‘गुडबाय’ या चित्रपटात पंडितजींच्या भूमिकेत दिसला होता. 45 वर्षीय सुनील ग्रोवरला खरी ओळख ‘द कपिल शर्मा शो’मधून मिळाली. याव्यतिरिक्त त्याने ‘गब्बर इज बॅक’, ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ आणि ‘भारत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ( sunil grover poor financial condition compelled actor to drive battery rickshaw after exit from the kapil sharma show )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘ये चाँद सा रौशन चेहरा’, क्रिती सेननचा क्लासी लूक पाहिलात का?

अच्छा तर ‘हे’ रहस्य आहे काजोलचे गोरे होण्यामागे, पोस्ट शेअर करत केला खुलासा

हे देखील वाचा