बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून आता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नावाची आता अधिकृतपणे नोंद झाली आहे. गुरुवार १४ एप्रिलला दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. सध्या त्यांना अनेकजण लग्नाच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देत आहेत. यामध्येच लोकप्रिय कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आपल्या जबरदस्त कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनील ग्रोव्हरने (Sunil Grover) आपल्या खास अंदाजात रणबेलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कपिल शर्माच्या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला सुनील ग्रोव्हर विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुनीलने साकारलेल्या डॉ. मशहूर गुलाटीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्याचप्रमाणे त्याच्या गुथ्थी या विनोदी भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले होते. याच कार्यक्रमात रणबीर कपूर आल्यानंतर सुनील ग्रोवेहरने गुत्थीच्या भूमिकेत रणबीरच्या नवरीची भूमिका केली होती. आता तेच फोटो शेअर करत सुनीलने रणबीरला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CcX6PP6Mqe-/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता सुनील ग्रोव्हरने डॉ गुलाटी आणि गुत्थी बनून लोकांची मने जिंकली होती. त्यामधलाच एक जुना फोटो सुनीलने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रणबीर आणि आलिया १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, सुनील ग्रोव्हरने रणबीर कपूरसोबतचे त्याचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो रणबीरच्या वधूच्या भूमिकेत गुत्थीची भूमिका साकारत आहे. हे फोटो कपिल शर्माच्या सेटवरील आहेत.
सुनील ग्रोव्हरचे लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फोटो पाहिल्यानंतर चाहते एकापाठोपाठ एक कमेंट करताना दिसत आहेत. सुनीलने त्याच्या इंस्टाग्रामवरून तीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहते त्यांचे हसू रोखू शकले नाहीत आणि एकापेक्षा एक मजेशीर कमेंट करत आहेत. यावर एका यूजरने, “अरे हो आधी तुझ्यासोबत लग्न झाले होते’.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे दुसर्या एकाने “बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असल्यामुळे तुम्हाला कॉल केला नसावा” असे म्हणत या फोटोवर विनोदी प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याने “तुमच्या विनोदाची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुम्ही सर्वोत्तम आहात..लव्ह यू सुनील भाई..” असे म्हणत सुनील ग्रोव्हरचे कौतुक केले आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-