Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड सुनील ग्रोव्हरने टाकले ‘गोपी बहू’ला मागे; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सुनील ग्रोव्हरने टाकले ‘गोपी बहू’ला मागे; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

अभिनेता सुनील ग्रोव्हर सध्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. सुनील नेहमीच समाजात घडणाऱ्या गोष्टींवर निर्भीडपणे त्याचं मत व्यक्त करतो. त्यामुळे अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावं लागतं. तसेच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो सतत अपलोड करत असतो. सुनील केवळ टीव्हीच्या पडद्यावरच नव्हे, तर तो त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना खूप हसवत असतो.

सुनीलचा पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाहीत. असं म्हणतात की, हसल्याने आयुष्य वाढतं. तेच हसवण्याच काम सुनील अगदी प्रामाणिकपणे करत असतो.

सुनील ग्रोव्हर बनला ‘टोपी बहू’
गेल्या वर्षी गेग्स ऑफ फिल्मिस्तानच्या एपिसोडमध्ये सुनीलने ‘टोपी बहू’ची भूमिका साकारली होती. खरं तर हे ‘साथ निभाना साथिया’मधील मुख्य पात्र ‘गोपी बहू’ या भूमिकेने प्रेरित झाले आहे.. सुनीलने साडी नेसण्यापासून तिच्या स्टाईलपर्यंत ‘गोपी बहू’ या व्यक्तिरेखेची नक्कल केली होती. या भागात त्याने आयकॉनिक दृश्य पुन्हा तयार केले.

‘गोपी बहू’ तिच्या पतीचा लॅपटॉप कपडे धुतल्यासारखा धुते. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो पाहिल्यानंतर लोक पोट धरुन हसत आहेत. सुनील ‘टोपी बहू’ बनून ‘गोपी बहू’ला अपयशी ठरवत होता. आता पुन्हा एकदा ‘गोपी बहू’ची व्यक्तिरेखा पडद्यावर दिसणार आहे ती ‘तेरा मेरा साथ’ मध्ये. हा कार्यक्रम फक्त ‘साथ निभाना साथिया’ची कथा पुढे नेईल.

सुनील ‘गोपी बहू’ची खिल्ली उडवली
निर्मात्यांनी एक प्रोमो जारी केला आहे, ज्यात सुनील ‘टोपी बहू’ म्हणून भूमिका साकारणार आहे. या प्रोमोमध्ये सुनील ‘गोपी बहू’ची खिल्ली उडवताना दिसत आहे. तिची सासू कोकिला येते आणि म्हणते की, आता ‘गोपी बहू’ बदली आहे.

प्रोमोमध्ये ‘गोपी बहू’ बाहेर आली आहे. ‘गोपी बहू’ साडीच्या जागी सूट घालून जाते आणि कोकिला म्हणते की, ‘गोपी बहू’ आता बदलली आहे आणि नवीन मॉडेल झाली आहे. लोकांना ‘गोपी बहू’पेक्षा ‘टोपी बहू’ जास्त आवडत आहे. ‘टोपी बहू’ने ‘गोपी बहू’ला मागे टाकले आहे, असे अनेक जण म्हणत आहेत. हा शो १६ ऑगस्टपासून स्टार भारतवर प्रसारित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा