नुकतंच टीव्ही क्षेत्रामधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम अभिनेता सुनील होलकर यांच वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. शक्रवार (दि, 13 जानेवारी) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई-बाबा, पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांनी शेवटी नॅशनल अवॉर्ड नामंकन मिळवणारा ‘गोष्ट एका पैठणीची‘ या चित्रपटामध्ये काम केले होते. अभिनेता मालिका आणि चित्रपटांमध्ये खूप सक्रिय होते.
टीव्ही विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहका उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) फेम सुनील होलकर (Sunil Holkar) यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक दिवस प्रेक्षकांना हसवले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीने कलाविश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सुनिल होलकर यांच्या अभिनयाबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी अशोक हांडे (Ashok Hande) यांच्या नाट्यगृहामध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. सुनील यांना सुरुवातीपासूनच अॅक्टर बनायचे होते. त्यांना इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आणि कथावाचक रुपाने ओळखले जायचे. त्यांनी 12 वर्षापेक्षाही जास्त काळ थेटर केलं आहे. त्यांनी 40व्या वर्षातच जगाचा निरोप घेणं हे कला विश्वासाठी दु:खाची बातमी आहे.
माध्यमातील वृत्तानुसार सुनील होलकर यांना त्यांच्या मृत्यूची अधिच कल्पना आली होती. असेही म्हटले जात आहे की, त्यांनी त्यांच्या एका मित्राला शेवटचा मेसेजही केला होता की, ही त्यांची शेवटची पोस्ट आहे. त्यांना सगळ्यांचा चांगल्या प्रकारे निरोप घ्यायचा होता. त्याशिवाय त्यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी क्षमा देखिल मागायची होती. असं त्यांच्या पोस्टमध्ये दिसून येत होतं. त्याशिवया त्यांनी सगळ्यांकडून मिळालेल्या प्रेमाबंद्दल धन्यवादही म्हटलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम…’, म्हणत हेमंत ढोमेने केली ‘वाळवी’ सिनेमावर पोस्ट
शाहरुख खानचा ‘पठाण’ गाठणावर उंची, दिसणार जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर