Thursday, March 28, 2024

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ झालं पोरकं, ‘या’ अभिनेत्यानेही कार्यक्रमाला केले अलविदा

टीव्ही क्षेत्रामधील लोप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ने अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मानावर राज्य केले आहे. यामधील प्रत्येकच पात्राने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहेत. हा कार्यक्रम चाहत्यांच्या घरातील अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, नुकतंच यामधील प्रसिद्ध ‘टप्पू’ पात्र स्वीकारणारा अभिनेता राज अनादकट याने कार्यक्रमाला अलविदा केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी प्रेक्षकांना दिली आहे.

लोकांच्या मनात घर करुन बसलेला प्रसिद्ध कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ( Tarak Mehta Ka Ooltah Chashma) यामधील अनेक कलाकार कार्यक्रम सोडून गेली आहेत त्यामुळे सध्याचा कार्यक्रम फार काही आवडेणासा झाला आहे. त्यामध्येच चाहत्यांसाठी अजून मन दु:खवणारी बातमी समोर येत आहे.  टप्पूचे पात्र करत असणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) याने देखिल कार्यक्रमाला अलविदा केले आहे. अनेक दिवसांपसून तो कार्यक्रमामध्ये दिसेनासा झाला होता. मात्र, प्रेक्षकांना आशा होती की, परत येईल. पण अभिनेत्याने मौन सोडून स्वत: सोशल मीडिवर पोस्ट शेअर करत सांगितले की, तो आता या कार्यक्रमाचा भाग नाही. अभिनेत्याच्या अशा पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

राजने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवकुन भावूक पोस्ट शेअर करत कार्यक्रम सोडण्याची माहिती देत लिहिले की, “सगळ्यांना नमस्कार, आता वेळ आली आहे की, सगळ्याच प्रश्नावर पूर्ण विराम लावायला पाहिजे. नीला फिल्म प्रोडक्शन आणि तारक मेहता का उल्टा चश्मासोबत माझा करार संपला आहे. शिकणे आणि नावीन मित्र बनवण्यासाठी हा माझ्या करिअरमधील सगळ्या भारी प्रवास होता.”

 

View this post on Instagram

 

राजने पुढे लिहिले की, “ज्यांनी मला याप्रवासात साथ दिला आणि मला पाठिंबा दिला. मी तारक मेहताच्या पूर्ण टीमला आणि माझ्या मित्रांणा धन्यवाद म्हणत आहे. तुम्ही सगळ्यांनी मझं टप्पूच्या रुपात स्वागत केलं, मला एवढं प्रेम दिलं. मी तारक ‘TMKOC’ च्या पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. मी तुम्हा सर्वाचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा येईल. तुमचे प्रेम आणि पाठिंबा सतत माझ्यासोबत राहिल.” अभिनेत्याच्या या पोस्टने तारक मेहता प्रेमींचे मन तोडले आहे. अनेक चाहते त्याला परतण्यास आग्रहल करत आहे तर काही चाहते त्याला भव्य गांधीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘वेड्यात काढलं जातंय…’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अक्षय कुमारला जितेंद्र अव्हाड यांचा टोला
‘धोंडी चंप्याची लव्हस्टोरी’ पाहूण व्हाल लोटपोट, भरत जाधव नवीन चित्रपट

हे देखील वाचा