Tuesday, July 9, 2024

‘मित्रांनो राजूसाठी प्रार्थना करा, त्याचा मेंदू…’, कॉमेडियन सुनील पालने दिली धक्कादायक माहिती

सध्या सर्वांचे लक्ष कॉमेडियन राजू श्रीवास्तव याच्याकडे लागले आहे. राजूची तब्येत खूपच गंभीर आहे. मागील ९ दिवसांपासून तो लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. त्याचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत राजूच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. राजू हा १० ऑगस्ट रोजी हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत होता. त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका बसला होता. त्यानंतर लगेच त्याला दिल्लीच्या एम्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काय म्हणाला सुनील पाल
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पहिल्या पर्वात सुनील पाल (Sunil Pal) याने राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याचा पराभव केला होता. एका इंस्टाग्राम अकाऊंटवर गुरुवारी (दि. १८ ऑगस्ट) पालचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पालने राजूच्या आरोग्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, “मित्रांनो, कृपया राजू श्रीवास्तवसाठी प्रार्थना करा. त्याची तब्येत खूपच गंभीर आहे. डॉक्टरांनाही सुचत नाहीये की, काय केले पाहिजे. त्याच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे.”

पीए काय म्हणाला?
राजू श्रीवास्तव याचा पीए गर्वित नारंग याने सांगितले की, रात्री त्याला काही इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नाहीये. तो सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. सिनेजगतातील अनेक कलाकार चिंतेत आहेत. ते सातत्याने राजू श्रीवास्तव याच्या आरोग्याबद्दल चर्चा करत आहेत.

रात्री उशिरा बिघडली होती तब्येत
राजू श्रीवास्तव याची तब्येत बिघडत चालली आहे. एम्सचे न्यूरो फिजिशियन डॉ. आंचल श्रीवास्तवच्या देखरेखीखाली त्याचे उपचार सुरू आहेत. असे म्हटले जात आहे की, बुधवारी रात्री उशिरा त्याचे शरीर सुजले होते. त्यानंतर त्याची तब्येत खूपच बिघडली.

राजू श्रीवास्तव याच्या आरोग्यासाठी चाहत्यांसोबतच कलाकारही प्रार्थना करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कॅनेडियन निर्मात्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ म्हणजे ‘कचरा’, म्हणाला, ‘ऑस्करला गेल्यास भारतासाठी…’
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा
‘…तो चुकीचा सिनेमा बनवत आहे’, आर माधवनने सांगितले आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाचे कारण

हे देखील वाचा