[rank_math_breadcrumb]

करिश्मा, नंदिता की प्रिया? संजय कपूरची सगळ्यात श्रीमंत बायको कोण?

संजय कपूरने आधी करिष्मा कपूर (Karishma Kapoor) आणि नंतर नंदिता महतानीसाेबत नातं जाेडलेलं हाेतं, पण दाेघींशी त्याचा घटस्पाेट झाला. त्या नंतर त्याने प्रिया सचदेवला आपली जाेडीदार बनवलं. पण गंमत म्हणजे, या तिघींपैकी सगळ्यात जास्त श्रीमंत काेण आहे?

बिझनेस टायकून संजय कपूर यांचं 12 जून 2025 राेजी निधन झालं. त्यांना 53 व्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी प्रिया सचदेव आणि चार मुलं आहेत. संजयचं हे दुसरं लग्न हाेतं. याआधी ते अभिनेत्री करिशमा कपूरशी लग्नात हाेते, आणि त्याआधी नंदिता महतानीशी. आता प्रश्न असा आहे, या तिनही बायकांपैकी सगळ्यात जास्त श्रीमंत काेण आहे?

संजय कपूरच पहिलं लग्न फॅशेन डिजाइनर नंदिता महतानीसाेबत झालं हाेतं. त्यांनी 1996 मध्ये लग्न केलं, पण फक्त चार वर्षांतच दाेघांचा घटस्फाेट झाला. त्या नंतर नंदिता अभिनेता विद्युत जामवालसाेबत रिलेशनशिपमध्ये हाेती, पण ते नातंही जास्त काळ टिकलं नाही. नंदिता अनेक सेलिब्रिटींची फॅशन स्टायलिस्ट आहे, आणि त्यामुळे ती खूप चांगली कमाई करते. रिपाेर्ट्नुसार, तिची एकून संपत्ती जवळपास 129 काेटी रुपये आहे.

नंदिता महतानीसाेबत घटस्पाेट झाल्यानंतर झाल्यानंतर संजय कपूरने करिशमा कपूर जाेडिदार म्हणून निवडलं. दाेघांचं लग्न 2003 साली माेठ्या थाटामाटात झालं हाेतं. त्यांना दाेन मुलं आहेत, सायरा आणि किआन. पण लग्नानंतर 13 वर्षांनी त्यांचं नातं तुटलं आणि त्यांनी घटस्फाेट घेतला. संजयपासून वेगळं झाल्यानंतर करिशमा अजूनही सिंगल आहे. तिने फारशे चित्रपट केले नाहीत, तरीही तिच्याकडे पैशाची काहीच कमी नाही. रिपाेर्ट्नुसार, करिशमाकडे सुमारे 120 काेटी रुपयांची संपत्ती आहे.

संजय कपूरने 2017 मध्ये तिसरं लग्न अभिनेत्री प्रिया सचदेवसाेबत केलं. त्याअधी प्रिया विक्रम चटवालची पत्नी हाेती आणि त्यांना मुलगीही आहे. प्रियाशी लग्न केल्यानंतर संजयने तिच्या मुलीची जबाबदारीही घेतली. पुढे संजय आणि प्रियाला एक मुलगा झाला. प्रिया संजयच्या शेवटपर्यंत त्याच्या साेबत हाेती, म्हणुनच संजयच्या तब्बल १०,३०० काेटी रुपयांच्या संपत्तीवर तिचा हक्क आहे. त्यामुळे प्रिया, करिशमा कपूर आणि नंदिता महतानीपेक्षा जास्त श्रीमंत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘पप्पांची नक्कल करू नकोस’; सुनिता आहुजांचा यशवर्धनला सल्ला
या बच्चनने स्वतः केलेला करिश्मा कपूरचा भावी ‘सून’ म्हणून उल्लेख, मग का तुटले अभिषेक- करिश्माचे लग्न