Monday, July 8, 2024

खऱ्या प्रेमकहाणीवर आधारित होता ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपट, निर्मात्यांनी केला होता ‘हा’ मोठा बदल

देशभरात सध्या अनेक कारणांंमुळे दंगलींचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. जो सगळीकडेच चिंतेचा विषय ठरत आहे. अशा दंगलींवरील कथा असलेले अनेक हिंदी चित्रपटही आजपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत ज्यामधील कथेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केल्याचे दिसत आहे. यांपैकीच एक चित्रपट म्हणजे गदर. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेला गदर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत सर्वांनाच चकित झाले होते. जाणून घेऊया चित्रपटाबद्दलचे माहित नसलेले किस्से.

हिंदी चित्रपटसृष्टीत विशेषत: स्वातंत्र्योत्तर दंगलींवर अनेक चित्रपट बनले. या चित्रपटांच्या माध्यमातून दंगलीच्या वेदना आणि त्याचे परिणाम दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनिल शर्मा यांनी 2001 मध्ये सनी देओल, अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्यासोबत ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाद्वारे फाळणी आणि दंगलीभोवतीच्या प्रेमाची कथा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. ‘गदर एक प्रेम कथा’ हा सत्यकथेवर आधारित चित्रपट होता. दुसऱ्या महायुद्धात बर्मा (म्यानमार) येथे ब्रिटीश सैन्यात सेवा बजावलेल्या फौजी बुटा सिंग यांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात निर्मात्याने स्वत:च्या अनुसार चित्रपटात काही बदल केले होते. खऱ्या कथेत बुटा सिंगच्या मैत्रिणीचा मृत्यू होतो, पण हे चित्रपटात दाखवलेले नाही. ‘गदर: एक प्रेम कथा’ ही ट्रक ड्रायव्हर तारा सिंगची कथा आहे, जो गायक बनण्याची आकांक्षा बाळगतो, परंतु अपघातामुळे तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. देशाच्या फाळणीनंतर सर्वत्र दंगलीची आग भडकली. दरम्यान, तारा संकटात सापडलेल्या सकिनाला भेटतो.

दोघे लग्न करतात, पण सकीनाचे वडील त्यांना पाकिस्तानात बोलावतात पण परत जाऊ देत नाहीत. आता पत्नीला परत आणण्यासाठी सनी काय धडपड करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात उत्तम संवादांची कमतरता नाही. चित्रपट जितका उत्तम आणि मनोरंजक होता तितकेच त्याचे संगीतही उत्तम होते. आनंद बक्षी यांनी गीते लिहिली असून उत्तम-जगदीश वाले उत्तम सिंग यांनी ते सुंदर संगीतबद्ध केले होते. ‘गदर एक प्रेम कथा’ ची गाणी इतकी हिट झाली की त्या वर्षी या चित्रपटाच्या संगीताचे 25 लाख युनिट विकले गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा