Sunday, April 20, 2025
Home कॅलेंडर ‘तू जर कुठं भेटला ना, तर तुला ठोकतच असतो मी’, सनी देओलने खुलेआम दिली होती धमकी

‘तू जर कुठं भेटला ना, तर तुला ठोकतच असतो मी’, सनी देओलने खुलेआम दिली होती धमकी

बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनी देओलने अनेक हिट सिनेमे हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. १९८२ साली सनीने ‘बेताब’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अमृता सिंग सोबत त्याची या सिनेमातील जोडी सर्वानाच आवडली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. त्यांनंतर सनीच्या गाडीने वेग धरला आणि तो त्याच्या करियरमध्ये पुढे जायला सुरुवात झाली. एकीकडे सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केलेल्या सनीचे पहिल्याच सिनेमापासून अभिनेत्रींसोबत असणाऱ्या अफेयरच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून येत होते.

सनीच्या पहिल्याच सिनेमातील अभिनेत्रींसोबत सनीच्या अफेयरच्या चर्चानी जोर धरला होता. सनीच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच बेताबमधे त्याची आणि अमृता सिंगची नवी, फ्रेश जोडी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र त्याचवेळी दुसरीकडे अमृता आणि सनीच्या अफेयरच्या चर्चाना उधाण आले होते.

मीडियामध्ये त्यावेळी हा विषय खूप जोरावर होता. त्यावेळी एका मुलाखतीमध्ये सनीला रिपोर्टरने याबद्दल एक प्रश्न विचारला होता की, तुमचा साखरपुडा झाला आहे. तुमच्या अफेयरच्या बातम्या जेव्हा तुमच्या पत्नीपर्यंत पोहचतात तेव्हा तुम्हाला काय वाटते?

त्यावर सनीने उत्तर दिले होते की, ” आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी ओघाने येणारच. अशा बातम्या येणे हे या क्षेत्रात खूपच नॉर्मल आहे. माझ्या आणि अमृताच्या रिलेशनच्या अनेक बातम्या वृत्तपत्रांमधून छापून आल्या होत्या. काही बातम्या मी सुद्धा वाचल्या आहेत. पण यासर्वांबाबत आपण काही करू शकत नाही. मात्र मला जेव्हा कधीही आणि कुठेही अशा बातम्या छापणारा व्यक्ती सापडला तर मी त्याच्यासोबत मारपीट करेल.”

सनी देओलने त्याच्या ३८ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहेत. सनीचे नाव अमृता सिंगसोबतच डिंपल कपाडिया बरोबर देखील जोडले गेले. असे देखील म्हटले जाते की, डिंपल यांनी राजेश खन्ना यांना सोडण्याचे सनी देओल मुख्य कारण होते. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा भारताबाहेर सोबत बसलेला एक व्हिडीओ खूप वायरल झाला होता.

हे देखील वाचा