Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड बॉर्डर-२ मध्ये वरून धवनची एन्ट्री ! सनी देओलने शुभेच्छा देत केलं स्वागत…

बॉर्डर-२ मध्ये वरून धवनची एन्ट्री ! सनी देओलने शुभेच्छा देत केलं स्वागत…

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल २०२६ मध्ये येणार असून त्याच्या स्टारकास्टबाबत वेळोवेळी अनेक नवनवीन खुलासे केले जात आहेत.

आधी सनी देओलने या चित्रपटाची घोषणा केली आणि आता वरुण धवनची एंट्रीही यात निश्चित झाली आहे. सनी देओलने वरुण धवनचं ‘बॉर्डर 2’ बटालियनमध्ये सामील झाल्याने स्वागत केलं आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत ही एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

वरुण धवनने इंस्टाग्रामवर ‘बॉर्डर’ शी संबंधित त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ‘बॉर्डर 2’मध्ये काम केल्याचा आनंद व्यक्त करत त्याने लहानपणापासून असे काहीतरी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ही व्यक्तिरेखा तो चांगल्या प्रकारे साकारणार असल्याचे आश्वासनही त्याने चाहत्यांना दिले आहे. देशभक्तीपर चित्रपटात वरुण पहिल्यांदाच सनी देओलसोबत दिसणार आहे.

सनी देओलने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये वरुण धवनचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ ‘बॉर्डर 2’ बाबत एक मोठा अपडेट सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सनी देओलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बॉर्डर 2’च्या बटालियनमध्ये सैनिक वरुण धवनचे स्वागत आहे.

वरुण धवनने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी ४ थी च्या वर्गात शिकत होतो तेव्हा मी चंदन सिनेमात बॉर्डर पाहिला आणि या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आजही ती भावना मला माझ्या देशासाठी जाणवते. आज जेव्हा मी आपले सैन्य पाहतो तेव्हा मला सलाम करावासा वाटतो जेव्हा ते आपल्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देतात.

वरुण धवनने पुढे लिहिले, ‘जेपी दत्ता सर असे मोठे चित्रपट बनवतात आणि ते माझे आवडते दिग्दर्शक देखील आहेत. भूषण कुमारने माझे करिअर आणखी खास बनवले आहे आणि मी सनी पाजीसोबत काम करणार आहे… हे सर्व माझ्यासाठी खूप खास आहे. मी या चित्रपटात एका सैनिकाची कथा मांडणार आहे आणि मी वचन देतो की हा सर्वात मोठा युद्धपट असेल, मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे, जय हिंद.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

शिल्पा शेट्टी वर संतापली फराह खान; म्हणाली, शिल्पा सोबत फ्लाईट मध्ये कधीही बसू नये…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा