Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टी वर संतापली फराह खान; म्हणाली, शिल्पा सोबत फ्लाईट मध्ये कधीही बसू नये…

शिल्पा शेट्टी वर संतापली फराह खान; म्हणाली, शिल्पा सोबत फ्लाईट मध्ये कधीही बसू नये…

फराह खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती बऱ्याचदा तिच्या मैत्रिणी आणि चित्रपट उद्योगातील सहकाऱ्यांसोबत मजेदार रील शेअर करत असते. यावेळी फराहने शिल्पा शेट्टीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला असून शिल्पा सोबत फ्लाइटमध्ये कधीही बसू नये, असे म्हटले आहे. 

फराहचे कारण ऐकून तुम्हाला खरंच हसू फुटेल आणि शिल्पाचा पती राज कुंद्राही फराहशी पूर्णपणे सहमत आहे. फराह खानने नुकताच इन्स्टाग्रामवर फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये दोघेही फ्लाइटमध्ये बसलेले दिसत आहेत. केबिन क्रू मेंबरने दिलेले ड्रिंक घेण्यासाठी फराह पुढे सरकली तेव्हा शिल्पा तिच्याकडे वळली आणि बोटाने नकार दिला. फराहने मेनूमधून काही खाद्यपदार्थ ऑर्डर केले, शिल्पा प्रत्येक नावावर नाही म्हणत डोके हलवताना दिसली.

व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की शेवटी फराहकडे कोणताही पर्याय उरला नाही आणि तिने क्रूला सांगितले की ती तिची सीट बदलणार आहे. हे ऐकून शिल्पा हसायला लागली. कॅप्शनमध्ये फराहने सर्वांना इशारा दिला की, “शिल्पा शेट्टीसोबत कधीही फ्लाइटमध्ये बसू नका. तुम्हाला खायला काहीही मिळणार नाही आणि तरीही तुम्ही काही तिच्यासारखे दिसणार नाहीच.”

फराहच्या या पोस्ट वर कमेंट करताना, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा म्हणाला, “मला वाटते फराह की पाणी तुमच्यासाठी सर्वात आरोग्यदायी पर्याय होता.” फराहची ही पोस्ट चाहत्यांनाही खूप आवडली आहे. एका यूजरने लिहिले की, “जिथे फराह आहे आणि तिथे मजा-मस्ती नाही… हे शक्यच नाही” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “शिल्पाला सगळ्यांना तिच्यासारखे बनवायचे आहे, जे शक्य नाही.” 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

‘स्त्री 2’ मध्ये नाव बदलून नेहा कक्करची खिल्ली का उडवली गेली? दिग्दर्शक अमर कौशिक यांनी केला खुलासा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा