Tuesday, March 5, 2024

गदर 2 नंतर लाहोर 1947 मध्ये दिसणार सनी देओल, जाणुन घ्या कोण असणार हिरोइन

‘गदर 2’ ब्लाॅकबस्टर झाल्यावर असं वाटलं की, त्यांनी जबरदस्त कमबॅक केला आहे. अजुनही प्रेक्षकांमध्ये त्यांचा दबदबा आहे. काही दिवसांपुर्वी तर सनी देओल(sunny deol) ‘ सफर ‘ चित्रपटाची शुटींग करताना दिसत होते. आता मात्र अशी बातमी य़ेत आहे की अभिनेता लवकरंच त्यांचा आगामी चित्रपट ‘लाहोर 1947 ‘(lahore 1947) च्या शुटींगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट अजुन प्रोसेसमध्ये आहे परंतु यावर लवकरंच का सुरु होणार असल्याचं दाखवलं जात आहे. हा चित्रपट आमिर शान प्रोडक्शनकडुन बनवला जाणार असुन. या पिरीयड ड्रामा फिल्ममध्ये सनी देओलसोबतंच राजकुमार संतोषी आणि आमिर खानदेखील टीमअप करत आहेत.

प्रीती होणार ‘लाहोर 1947’ची अभिनेत्री
बुधवारी, 24 जानेवारीला, प्रीती झिंटाला(preity Zinta) मुंबईमधील एका स्टुडीयोमधुन बाहेर येताना स्पाॅट केलं गेलं. रिपोर्टसनुसार अभिनेत्री ‘ लाहोर 1947 ‘च्या लुक टेस्टसाठी स्टुडीयोमध्ये आली होती. एका वृत्तवाहीनीला मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात कित्तेक वर्षांनी प्रीती झिंटा सनी देओलसोबत मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. यापुर्वी सनी आणि प्रीतीने सोबत ‘हीरो: लवस्टोरी ऑफ अ स्पाय’,’फर्ज ‘ आणि ‘ भैयाजी सुपरहिट’ यांसारख्या चित्रपटात सोबत काम केलं होतं.

मध्यंतरी जेव्हा सनी देओल,करण जोहर च्या ‘काॅफी विथ करण सिझन 8’ मध्ये आले असताना कोलॅबोरेशन संबंधी एक प्रश्न विचारला होता. यावर ते म्हणाले होते की, आमिर खान(amir khan) जेव्हा ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीला आले तेव्हा ते माझ्याजवळ आले आणि बोलले की, त्यांना माझ्याशी भेटायचं आहे. मी तेव्हाच विचारलं की, ही भेट कोणत्या विषयीसंबंधी असेल परंतु त्यावेळी त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो, तेव्हा आम्ही दोघांनी काही कल्पना आणि काही गोष्टींमध्ये कोऑपरेशनवर चर्चा केली. या चर्चेनंतर आम्ही दोघेही एका प्रोजेक्टवर संमत झालो, आणि तो प्रोजेक्ट लवकंरंच सुरु होणार आहे.

सांगायचं झालं तर लाहोर 1947 चित्रपट हा आमिर खान आणि संतोषी(Santoshi) यांची रियुनियन फिल्म असणार आहे. याआधी दोघांनी ‘ अंदाज अपना अपना ‘ चित्रपटात सोबत काम केलं होतं. याव्यातिरिक्त संतोषी आणि सनी देओलयांनी याआधी सोबत ‘घायल’, ‘दामिनी ‘ आणि ‘घातक ‘ यांसारख्या ब्लाॅकबस्टर फिल्मस दिल्या आहेत.

हे देखील वाचा