बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सनी लिओनी ओळखली जाते. सनीच्या बोल्ड इमेजने केवळ भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात तिचे असंख्य चाहते आहे. सुरुवातीला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सनीने बॉलिवूडमध्ये येत तिची जुनी ओळख पुसून नवी ओळख तयार केली. सनीला सोशल मीडियावर लाखो चाहते फॉलो करतात.
सनी प्रमाणेच मिया खलिफा देखील खूप लोकप्रिय आहे. मियाची फॅन फॉलोविंग एखाद्या मोठ्या स्टारला देखील टक्कर देईल इतकी आहे. आता अचानक सनी आणि मिया चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सनीने शेअर केलेली पोस्ट.
फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीत आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणकोणती शक्कल लढवतात याचा आपण विचार देखील करू शकत नाही. सनीने यावर प्रतिक्रिया देत तिच्या इंस्टा स्टोरीवर एक मजेशीर फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो दिल्लीमधील असून एका चाप विकणाऱ्या दुकानाचा असून त्यावर लिहिलेला मेनू खूपच मजेशीर आणि आकर्षक आहे.
त्या दुकानाच्या बोर्डवर सनी लिओनी चाप, बेबी डॉल चाप आणि मिया खलिफा चाप असे मेनूची नावे आहेत. ही दुकानाची पाटी पाहून सनीने LOL अशी कमेंट देखील केली आहे. सनीच्या आणि मियाच्या नावाने विकल्या जाणाऱ्या चापवर सनीच्या आणि मियाच्या फॅन्सच्या देखील मजेशीर कमेंट्स येत आहेत.
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सनी लिओनी शेवटची ‘बुलेट्स’ या वेबसीरिजमधे दिसली होती. तिच्यासोबत करिश्मा तन्ना देखील होती. सनी लवकरच ‘शेरो’ आणि ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्येही दिसणार आहे. अनामिकाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…