सनी लिओनी (Sunny Leone) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त अभिनयाने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या अभिनयाचे आणि बोल्डनेसचे असंख्य चाहते सध्या सिने जगतात पाहायला मिळतात. अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करुन सनीने बॉलिवूडमध्ये १० वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केली आहेत. सनीचे अनेक किस्से बॉलिवू़मध्ये चांगलेच चर्चेत असतात. यामध्ये पंजाबी रॅपर हनीसिंगने (Honey Singh) सनीबद्दल एका जाहीर कार्यक्रमात एक वक्तव्य केले होते. ज्याची सिने जगतात प्रचंड चर्चा झाली होती. काय होते हे प्रकरण चला जाणून घेऊ.
बघता बघता सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये दहा वर्षे पूर्ण केली आहेत. रिअलिटी शो बिग बॉसमध्ये, तिला निर्माता महेश भट्ट यांनी तिच्या बॅनरच्या चित्रपटाची ऑफर दिली आणि 2012 मध्ये सनी लिओनने ‘जिस्म 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पॉर्न स्टारची प्रतिमा नेहमीच तिच्यासोबत चिकटलेली असते ही वेगळी गोष्ट. बऱ्याच काळापासून अनेक बॉलिवूड लोकांनी तिच्यापासून अंतर ठेवले, परंतु सनीची लोकप्रियता इतकी झपाट्याने वाढली की तिचे आयटम डान्स मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये ठेवण्यात आले.
एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस 2’ या चित्रपटात सनी लिओनीवर चित्रित केलेले बेबी डॉल हे गाणे आजही खूप गाजते. सनी लिओन आणि गायक यो यो हनी सिंग एकाच चित्रपटातील चार बॉटल वोडका या गाण्याच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. सनी लिओन आणि गायक-रॅपर यो यो हनी सिंग 2014 साली रागिनी एमएमएस 2 च्या मीडिया प्रमोशन दरम्यान स्टेजवर एकत्र आले होते. त्या काळात हनी सिंगही त्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होता. मुंबईत झालेल्या या प्रमोशन इव्हेंटमध्ये सनी लिओन आणि हनी सिंगला एकत्र पाहून शेकडो लोकांनी शिट्ट्या वाजवल्या.
दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना सनीचे हनी सिंगने असे कौतुक केले. ज्यामुळे तिला चांगलेच लाजल्यासारखे झाले होते. वास्तविक हनी सिंगने सनीचे कौतुक करताना मी तिचा खूप मोठा चाहता असून तिचे सगळे चित्रपट पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यावेळची गंमत अशी की सनीने फक्त दोनच चित्रपटात काम केले होते. त्यामुळेच हनी सिंगच्या या वक्तव्याने ती खूपच गोंधळलेली पाहायला मिळाली.
हेही वाचा – सलमानने मारलेल्या काळवीटाचे उभारणार भव्यदिव्य स्मारक, बिश्नोई समाजाची घोषणा
लग्नाला महिने झाल्यानंतरही संपेना दाक्षिणात्य सुंदरीचा हनीमून, पतीसोबत गेली ‘या’ देशात
आठवडाभराच्या जीवन-मरणाच्या लढाईनंतर अॅनी हेचे यांचे निधन, प्रियांका चोप्राने वाहिली श्रद्धांजली