आठवडाभराच्या जीवन-मरणाच्या लढाईनंतर अ‍ॅनी हेचे यांचे निधन, प्रियांका चोप्राने वाहिली श्रद्धांजली

आठवडाभर जीवन-मरणाची लढाई लढल्यानंतर हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅनी हेचे हिने जगाचा निरोप घेतला. अ‍ॅन हेचे या ५३ वर्षांच्या होत्या. नुकतेच त्या कोमात गेल्याची बातमी समोर आली होती. अभिनेत्रीची कार लॉस एंजेलिसच्या मार व्हिस्टा भागात एका जळत्या इमारतीवर धडकली आणि ती गंभीररीत्या भाजली. अपघातानंतर तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

5 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघातापासून मेंदूला दुखापत झाल्याने अ‍ॅनी हेचे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत होत्या. अ‍ॅनीच्या प्रतिनिधीने एक निवेदन जारी केले की, अ‍ॅनीसाठी जगण्याची कोणतीही आशा नाही आणि तिला लाइफ सपोर्ट सिस्टममधून काढून टाकले जाईल. तसेच अणे यांचे अवयव दान करण्यात येणार आहेत. त्याचवेळी, आता कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार अ‍ॅनीला मृत घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्यांचे अवयव दान करण्यासाठी कुटुंबीयांनी त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले आहे.

priyanka chopra

अ‍ॅनी हेचे निधन झाल्याची बातमी कळताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्राने तिची पोस्ट शेअर करून अ‍ॅनीला श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांकाने लिहिले आहे की, “मला अभिमान आहे की मी तुझ्यासारख्या व्यक्तीसोबत काम केले आहे. तुम्ही खूप छान व्यक्ती आणि उत्तम कलाकार होता. माझ्या हृदयात तुझे एक विशेष स्थान आहे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.” यासोबतच प्रियांकाने अ‍ॅनीच्या कुटुंबाला पाठिंबाही व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

संजय दत्तची एक्स पत्नी ‘या’ व्यक्तीसोबत होती रिलेशनशिपमध्ये; ब्रेकअपचे धक्कादायक कारण समोर

अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांना पाठवले खास गिफ्ट, म्हणाले, ‘जागे व्हा आता खूप झालं’

अरबाज आणि मलायकाच्या घटस्पोटावर अशी होती सलीम खान यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी माझ्या…’

Latest Post