Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सनी लिओनीच्या नऊवारीमधील मराठमोळ्या लुकने चाहते घायाळ! फोटोवर पडतोय कमेंट्सचा पाऊस

महाराष्ट्राच्या आणि एकूणच भारताच्या इतिहासात मानाचे आणि महत्वाचे स्थान असलेल्या कोरेगाव-भीमा गावातील ‘लढाई’चा इतिहास आता लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित असणारा ‘द बॅटल ऑफ भीमा-कोरेगाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पुर्वी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केले आहेत. या चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर तो प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीत उतरताना दिसत आहे.

चित्रपटामध्ये अभिनेत्री सनी लिओनी एक प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाच्या पोस्टर आणि फर्स्टमध्ये सनी लिओनीचा मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एका नृत्यांगनेच्या रुपात वावरणाऱ्या हेर म्हणजे गनिमाच्या भूमिकेत सनी लिओनी दिसणार आहे. सन 1795 ते 1818 या कालावधीत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमाचे कथानक घडते. प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल महार योद्ध्याची भूमिका साकारणार आहे.

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे जबाबदारी सांभाळत आहेत. हा चित्रपट 2021 च्या उत्तरार्धात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे कोरेगाव-भीमाचा इतिहास…

दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा भागात झालेल्या युद्धात दुसरे बाजीराव पेशवा यांच्या सैन्याविरुद्ध लढलेल्या ब्रिटीश सैन्यात महार सैनिक होते, असे इतिहासात सांगितले जात आहे. यावर बोलताना, ‘भीमा कोरेगावची लढाई ही शोषित आणि समानतेच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजातील उदासीन घटकांची योग्यता, त्याग आणि पराक्रम यांचे प्रतीक आहे’ असे रमेश थेटे म्हणाले.

हे देखील वाचा