Wednesday, July 3, 2024

‘मछली’ गाण्यावर सनी लियोनीने केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले घायाळ

सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार त्यांचे फोटो तर पोस्ट करतच असतात. मात्र या फोटोंसोबतच ते त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ देखील शेअर करत फॅन्सचे मनोरंजन करत असतात. कलाकारांचे हे व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सनी लियोनी. सनी नेहमीच सोशल मीडियावर तिचे वैयक्तिक, कुटुंबाचे, सेटवरील फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडिओला फॅन्सची चांगली पसंती देखील मिळत असते. नुकताच सनीने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, या व्हिडिओमध्ये सनी डान्स करताना दिसत आहे.

बॉलिवूडच्या अतिशय सुंदर आणि उत्तम डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनीचे देश विदेशात करोडो फॅन्स आहेत. तिने तिच्या अंदाजने आणि जबरदस्त डान्सने कमी काळातच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये डान्स करत प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. आता देखील तिने पावनी पांडे आणि शाहिद माल्या यांच्या ‘मछली’ या गाण्यावर जबराट डान्स केला असून, त्याच्या व्हिडिओ सध्या सर्वत्र गाजत आहे. या व्हिडिओमध्ये सनीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यात ती खूपच आकर्षक दिसत आहे. सनीचा हा व्हिडिओ लोकप्रिय होत असताना त्याला आता पर्यंत ५० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज आले असून, असंख्य कमेंट्स आल्या आहेत. सनीने तिचा हा डान्स व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “Show me your steps for #machhli’.

सनीने बिग बॉस शोमध्ये सहभागी होत या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे ती जॅकपॉट, रागिनी एमएमएस २, कुछ कुछ लोचा हैं आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या डान्सचा जलवा देखील दाखवला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा