Tuesday, July 23, 2024

बाप रे! सनी लिओनीसोबत समुद्राच्या मधोमध झाला अपघात, मस्ती करणे पडले महागात

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने असा एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून तिचे चाहते चिंतेत पडले, पण याउलट काही चाहते खुशही झाले. सनी लिओनी समुद्रामध्ये मस्ती करण्यासाठी स्टाईलमध्ये गेली तर होती, पण त्यानंतर तिच्यासोबत जे झाले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

समुद्रात अनेकदा पडली सनी
सनी लिओनीने नुकताच मालदीवचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बिकिनी घालून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान, तिचे संतुलन बिघडते, ती पडते आणि हे एकदा नाही तर अनेक वेळा घडते. लाखो प्रयत्न करूनही सनीला या वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येत नाही. सनीचा हा व्हिडिओ मजेदार व्हिडिओ पाहून चाहतेही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. (sunny leone shared a video on social media doing water sport in maldives)

सनी लिओनीने शेअर केला पोस्टर
अलीकडेच, सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओएमजी’ अर्थात ‘ओह माय घोस्ट’चा फर्स्ट लूक रिलीझ झाला आहे. पोस्टरमध्ये सनी लिओनी निडर स्टाईलमध्ये हातात खंजीर धरलेली दिसत आहे. साऊथचा स्टार विजय सेतुपती याने चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. ‘ओ माय घोस्ट’मध्ये सनी लिओनी एका राणीच्या भूमिकेत आहे, जिच्यासोबत एक मोठे रहस्य जोडले गेले आहे.

 

महत्त्वाचे आहे सनीचे पात्र
‘ओह माय घोस्ट’ हा एक तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन युवान यांनी केले आहे. युवनने नुकतीच या चित्रपटाबद्दल आणि सनी लिओनीच्या व्यक्तिरेखेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. युवानने सांगितले की, “सनी लिओनीच्या व्यक्तिरेखेची खास गोष्ट म्हणजे, ती चित्रपटाची नायिकही आहे आणि खलनायिकही आहे. असे काही क्षण असतील जिथे ती खूप कोमल दिसेल आणि मग असेही काही क्षण असतील जिथे ती तिचे अहंकारी रूप दिसेल. या भूमिकेत सनी लिओनीला दोन्ही प्रकारच्या भावना दाखवायच्या होत्या आणि तिने अप्रतिम काम केले आहे.”

हेही वाचा

हे देखील वाचा