Friday, July 5, 2024

स्टायलिश साडी नेसून सनीने वाढवला सोशल मीडियाचा पारा; फोटोशूटदरम्यान मस्ती करताना दिसली ‘बेबी डॉल’

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजाने सोशल मीडियाचा पारा वाढवते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सनी नेहमी फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. अशातच सनीने एक नवीन स्टायलिश लूक केला आहे त्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे. ती या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अलीकडेच सनीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. त्यामध्ये तिने क्रीम रंगाची साडी घातली आहे. त्यासोबत खोलवर गळ्याचे स्लीव्हलेस ब्लाऊज तिने घातले आहे आणि कमरेला स्टायलिश पट्टा लावला आहे. त्यावर मोत्यांचे लटकन लावले आहेत आणि आपले केस देखील मोकळे सोडले आहेत. तिने आपल्या कानामध्ये लांब कानातले घातले आहेत, जे तिचा लूक आणखी शानदार बनवत आहेत.

तिचे हे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. ती फोटोशूट दरम्यान खूप मस्ती करताना दिसत आहे. सनी या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत आहे. फोटो शेअर करताना तिने यावेळेस कॅप्शन न देता फक्त एक इमोजी टाकला आहे.

गेल्याकाही दिवसांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर व आपल्या मुलांसह मालदीवच्या सहलीला गेले होते. दुसरीकडे तिचे कुटुंब या वर्षी नवीन घरात राहायला गेले आणि तिच्या मुलांना आता खेळण्यासाठी अधिक जागा मिळेल, याची खात्री केली तिने केली आहे. मुलांना खेळायला जागा मिळाली आहे, त्यामुळे ती जरा जास्तच खुश आहे.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सनी लवकरच तमिळ चित्रपट ‘ओह माय घोस्ट’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक हॉरर आणि कॉमेडी आहे. तिने ‘जिस्म 2’ मध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात कामे केली आहेत. तिला ‘बेबी डॉल’ म्हणूनही ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऋतिक रोशनकडून ‘विक्रम वेधा’च्या ऍक्शन टीमला खास गिफ्ट; आपली परंपरा ठेवली अबाधित

-‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…, म्हणत ‘या’ अभिनेत्री सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

-जाळ अन् धूर संगटच! मोनालिसाने क्रॉप टॉप ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा, फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा