गेल्या दोन दिवसांपासून सिनेसृष्टीसह उत्तर प्रदेशमध्ये नुसता गोंधळ पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश पोलिसात भरती होण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनीने (sunny leone) अर्ज केला असल्याची जोरदार चर्चा रंगली. व्हायरल होणारे अॅडमिट कार्ड पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. यानंतर अभिनेत्रीबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
एका तरुणानं परिक्षेचा फॉर्म भरला.
अन् जेव्हा त्याला हॉल तिकीट मिळालं तेव्हा त्यावर चक्क सनी लिओनीचा फोटो होता. या ढसाळ कारभारामुळं उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कॉन्स्टेबल भर्ती परीक्षेत मोठा गोंधळ माजलाय. तरुणाच्या जागी सनी लिओनीची फोटो कसा काय? हा प्रश्न चाहत्यांसह पोलिसांना देखील पडला आहे. पोलिस या गोष्टीचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र सिंग असं आहे. धर्मेंद याने माध्यमाला यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. ”मी कॅफेमधून पोलिस भरतीचा फॉर्म भरला होता. त्यावेळी सर्व माहिती योग्य भरण्यात आली होती. माझं नाव, फोटो, आधार क्रमांक, पत्ता, मार्कशीट यामध्ये कुठलीच चूक केली नव्हती. पण जेव्हा परिक्षेचं हॉल तिकिट आलं तेव्हा त्यामध्ये माझ्या ऐवजी सनी लिओनीच्या डिटेल्स होत्या. आता ही गडबड कशी झाली मला माहित नाही. ” धर्मेंद्रच्या या उत्तरामुळे नेमकी कोणाची चूक असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.
यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या ६०२४४ पदांच्या भरतीसाठी दोन दिवसांची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला ४८ लाखांहून अधिक उमेदवार बसले आहेत. पहिल्याच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला अनेक केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या दरम्यान, कन्नौज जिल्ह्यात एक अॅडमिट कार्ड समोर आले आहे, जे केवळ यूपीमध्येच नाही तर देशभरात चर्चेत विषय ठरले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आर माधवनचा ‘शैतान’ चित्रपटातील फर्स्ट लुक आऊट; थ्रिलर अन् बरंच काही…
‘या’ अभिनेत्रिला M. S. Dhoni ने लव्ह गुरु बनत दिला होता मोलाच सल्ला