शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहेत रोज नवीन काहीतर आरोप करत चित्रपटाला ट्रोल केलं जातंय ‘बेशरम रंग‘ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामध्येच बॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकतंच भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलिवूड हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी ओखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने नुकतंच भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसवर नवीन व्हिडिओशूट केले आहे. त्याशिवाय तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘पठाण चित्रपटामधील बेशरम रंग (Bsharam Rang) गाण्यामंध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे देशभरता वादाचे वातावरण निर्माण झाले असून चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंड सुरु केला आहे. यावादामध्येच सनीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे तिने भगव्या रंगाचाच बोल्ड ड्रेस परिधान केलेला दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी समुद्रकिनाऱ्यावर झोपलेली दिसून येत असून एक कॅमरामॅन तिचा व्हिडिओ शूट करत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, पणी ‘आ आ आया’ सनीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर कहर केला आहे. काहीच वेळात या व्हिडिओवर 5 लाखापेक्षाही जास्त व्युज मिळाले असून चाहते सनीचे भरभरुन कौतुक करत आहेत. एका युजरने लिहले की, “हॉट” तर दुसऱ्याने लिहिले की, “तुम्ही तर पाण्याला आग लावली.”
View this post on Instagram
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी सध्या स्प्लिट्सविला 14 (Splitsvilla 14) या रियालीटी शोमध्ये सुत्रसंचालन करत आहे. त्याशिवाय कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओमध्ये सनी डान्स करताना दिसून येत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बेशरम रंग’ गाण्याची गायिका स्पष्टच म्हणाली, ‘कपड्यांपेक्षा जास्त…’
रितेशसोबत लग्नानंतर एका महिन्यातच तुटली होती जिनिलिया, ‘या’ गोष्टीमुळे होती नाराज