Wednesday, April 9, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या मुलांना समजले तर…’ पॉर्न इंडस्ट्रीची पार्श्वभूमी असल्याने सनीला सतावतेय ‘ही’ चिंता

‘माझ्या मुलांना समजले तर…’ पॉर्न इंडस्ट्रीची पार्श्वभूमी असल्याने सनीला सतावतेय ‘ही’ चिंता

सनी लियोनीने (Sunny Leone) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सनीच्या दमदार अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी लियोनीने पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. आता पॉर्न इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसलेल्या सनीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळेच अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी सनीची निवड झाली होती. ज्यामधील तिच्या अभिनयाचे आणि बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा झाली होती. मात्र आजही सनीला तिच्या पॉर्न इंडस्ट्रीच्या पार्श्वभूमीबद्दल एक चिंता सतावत आहे ज्याचा अलिकडेच तिने खुलासा केला आहे. 

अभिनेत्री सनी लियोनीने एका मुलाखतीत बोलताना याबद्दलचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की “माझ्या भुतकाळातील कामाबद्दल माझ्या मुलांनी मला जज करु नये. त्यांना माझा भूतकाळ समजताच त्यावरुन माझ्याबद्दल चुकीचा समज करु नये.” याबद्दल बोलताना सनी म्हणाली की, “माझ्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल त्यांना मोठेपणी माहित होईल कदाचित या गोष्टी त्यांना आवडणारही नाहीत. परंतु हे सर्व का घडले याबद्दलही त्यांना माहिती होईल.आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतील.”

याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की “मी माझ्या आवडीनुसार निवड केली आहे आणि त्यांना माहित असले पाहिजे की ते देखील त्यांची निवड करू शकतात. जोपर्यंत त्यांच्या इच्छेने कोणाचेही नुकसान किंवा दुखापत होणार नाही तोपर्यंत ते त्यांची निवड करु शकतात. जसे माझ्या मुलाला अग्निशामक दलाचा अधिकारी व्हायचे आहे.” दरम्यान सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. त्यांनी मुलगी निशाला दत्तक घेतली आहे. त्यांना दोन मुले आहेत ज्यांचा जन्म सरोगसीच्या मदतीने झाला आहे. चित्रपटांप्रमाणे सनीचे म्युझिक व्हिडिओही सर्वत्र चांगलेच चर्चेत येत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा