अरे बापरे! सनी लियोनीला अचानक झाले तरी काय? चित्रपटाच्या सेटवर जमिनीवरच लागली लोळायला


कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूप जवळचे नाते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार फॅन्सच्या संपर्कात तर राहतातच सोबतच त्यांना मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट देखील मिळते. त्यामुळे कलाकार देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय राहतात. कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करतात. याबाबतीत अभिनेत्री सनी लियोनी देखील मागे नाही. सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेत्रींच्या यादीत सनीचा वरचा नंबर लागतो. ती नेहमी तिच्या शूटिंग सेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतच असते.

नुकताच सनीने तिचा एक मजेशीर व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की, व्हिडिओमध्ये सनी नक्की करत काय? आणि का? या व्हिडिओमध्ये सनी जमिनीवर लोळताना दिसत आहे. सनीला असे लोळताना पाहून पाहणाऱ्याला हसायला देखील येईल आणि प्रश्न देखील पडेल नक्की सनी करत काय? सनीला असे जमिनीवर लोळताना पाहून एक महिला तिला विचारते की, ‘तू असे का करत आहेस?’ यावर सनी म्हणते, ‘मी प्रॉडक्शनचे पैसे वाचवत आहे.’ या उत्तरावर पुन्हा ती सनीला विचारते की, ‘असे कसे पैसे वाचवत आहेस तू?’, यावर सनी सांगते, ‘मला प्रॉडक्शनने पावडर लावायला सांगितले आणि मला पावडर सापडली नाही म्हणून मी अशी जमिनीवर लोळून पावडर लावत आहे.’ सनीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, ‘कामावर एक सामान्य दिवस.’ (sunny leone lying on the ground while shero movie shooting)

या व्हिडिओमध्ये सनीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पॅन्ट घातली असून, ती याच कपड्यांवर लोळताना दिसते आणि अचानक उठून उभी राहत कपडे झटकते. तिला असे करताना पाहून तिथे असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकतो. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक कमेंट्स देखील येत आहे. सध्या सनी तिच्या आगामी ‘शिरो’ या साऊथ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.