Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमान खानने भाच्यांसोबत केला हिट गाण्यावर डान्स; चाहते म्हणाले, ‘बेस्ट मामा!’

अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या दबंग टूरमध्ये व्यस्त आहे. दुबईमध्ये सलमान खानला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा, दिशा पटानी, गुरू रंधावा, सई मांजरेकर असे अनेक दिग्गज कलाकार यामध्ये सहभागी झालेत. मात्र सलमान खानसोबत गेलेल्या त्याच्या भाच्याचा डान्स व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. खुद्द सलमान खान या छोट्या मुलांसोबत यामध्ये रमल्याचे दिसत आहे.

अभिनेता सलमान खानसध्या दुबईमध्ये आपल्या डान्सचा तडका लावताना दिसत आहे. त्याचसोबत त्याची बहीण अर्पिता आणि पती आयुष शर्मा त्यांच्या दोन्ही मुलांना आहिल आणि आयत यांना घेऊन आले आहेत. सलमान खानचा त्यांच्यासोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान आपल्या भाचा आणि भाचीला डान्स शिकवताना दिसत आहे. यामध्ये आहिल कॅमेऱ्यात बघत आहे, तर आयत आपल्या मामाने शिकवलेल्या स्टेप करण्याचा प्रयत्न करत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सलमान खानचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर एका चाहत्याने “ही मुल खूप नशिबवान आहेत ज्यांना सलमान खान सारखा मामा मिळाला आहे” असे म्हणत कौतुक केले आहे. तर आणखी काही लोकांनी यावर बेस्ट मामा म्हणत सलमान खानचे कौतुक केले आहे.

तत्पूर्वी सलमान खान सध्या त्याच्या या दुबई टूर मध्ये धमाल करताना दिसत आहे. नुकताच दुबईमधील त्याच्या एका फॅनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुणी सलमान खानला भेटण्यासाठी रडत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अभिनेता सलमान खान नुकताच ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीमध्ये झाले असून चाहत्यांना आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा