Thursday, July 24, 2025
Home अन्य ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात

ईशा गुप्ताने इंस्टा स्टोरीला लिहिले असे काही की, चाहतेही पडले विचारात

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला असे काही कॅप्शन दिले आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सगळ्यांना आता हा प्रश्न पडला आहे की, तिच्या मनात नक्की आहे तरी काय? जर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे.

ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे की, “तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी हिरो व्हावे लागेल.” (Super bold esha gupta post on Instagram goes viral)

याआधी ईशाने रोड ट्रीपचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ईशा डेनिम जीन्स आणि लेदर जॅकेटमध्ये दिसत होती. हा फोटो शेअर करून ईशाने लिहिले होते की ” टोलोडो शहर.”

माध्यमातील वृत्तानुसार ईशाने तिच्या लाईफ पार्टनरबाबत देखील सांगितले आहे. तिने सांगितले होते की, “माझ्या कुटुंबात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त आहे. आपल्याकडे पालकांनी त्यांच्या मुलींना स्वतंत्र ठेवले पाहिजे. जर मी एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न केले आणि नंतर त्याने मला सोडून दिले,‌तर मी त्याने दिलेल्या भत्त्यावर आयुष्यावर नाही जगू शकता. मला स्वतः साठी काहीतरी करायचे आहे. मला माझे आडनाव बदलायचे नाही. मला असा पार्टनर पाहिजे तो मला पाठिंबा देईल आणि मला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही.” ईशा गुप्ता लवकरच ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा