Wednesday, July 3, 2024

आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

सोनी टीव्हीचा लोकप्रिय डान्स रियॅलिटी शो असणाऱ्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चा शनिवारी (९ ऑक्टोबर) ‘नचपन का महामहोत्सव’ ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला. मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला डान्सचा टशन संपला आणि या शोच्या चौथ्या पर्वाला त्याचा विजेता मिळाला आहे. आसामच्या फ्लोरिना गोगोईने या शोच्या विनर ट्रॉफीवर नाव कोरत चौथ्या पर्वाचे जेतेपद मिळवले. ७ वर्षीय फ्लोरिना तिच्या मजेदार आणि जबरदस्त परफॉर्मन्सने केवळ परिक्षकांचेच नाही, तर प्रेक्षकांचीही मने जिंकताना दिसली.

टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वांत लोकप्रिय शो असणाऱ्या सुपर डान्सर चॅप्टर ४ ने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. लहानमुलांमधील डान्सचे अद्भुत टॅलेंट जगासमोर आणणारा हा शो टिआरपीच्या स्पर्धेत देखील पुढे होता. अनेक आठवड्यांपासून सुरू असणारा हा शो प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करताना दिसला. स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स, गीता, शिल्पा आणि अनुराग बासू यांचे परीक्षण यांमुळे शोने खूप लाइमलाइट मिळवले.

शोचे पाच फायनलिस्ट होते. ज्यात फ्लोरिना गोगाई (जोरहाट, आसाम), ईशा मिश्रा (नवी दिल्ली), संचित चानाणा (पंजाब), पृथ्वी राज (बेळगाव, कर्नाटक), नीरजा तिवारी (होशंगाबाद, मध्य प्रदेश) यांची नावे होती. यावर्षी मार्चमध्ये शो सुरू झाला. सहा महिन्यांच्या मोठ्या काळाने या शोचा अंतिम भाग संपन्न झाला.

शोच्या अंतिम भागात नीरजाने आपल्या सुपर गुरू भावनाबरोबर ‘किवे मुखडे टू’वर तिच्या परफॉर्मन्सला सुरुवात केली. आपल्या मुलीला फिनालेमध्ये परफॉर्म करताना पाहून नीरजाची आई भावूक झाली आणि म्हणाली की, त्यांना आपल्या मुलीच्या परफॉर्मन्सवर गर्व आहे.

स्पर्धकांव्यतिरिक्त शिल्पा शेट्टीनेही तिच्या उत्कृष्ट डान्सने सर्वांना मंत्रमुग्ध केले. जलपरीच्या गेटअपमध्ये असणाऱ्या शिल्पाने ‘आफरीन-आफरीन’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यानंतर राघव जुयालने शिल्पाला स्टेजवर डान्स करायला बोलावले आणि बादशाहही स्टेजवर आला. त्याने ‘मर्सी’ हे गाणे गायले. या गाण्यावर शिल्पानेही ठुमके दिले. या दरम्यान, राघवने पारितोष त्रिपाठीची खिल्ली उडवली आणि म्हणाला की, ‘शिल्पाला दुसऱ्या कुणासोबत डान्स करताना पाहून मला हेवा वाटतो.’ राघवने देखील शिल्पासोबत ‘लाइफ इन अ मेट्रो’ यातील ‘ओ मेरी जान’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला.

शोमध्ये फ्लोरिनाने आपल्या डान्सने तर सर्वांनाच वेड लावले सोबतच प्रत्येकजण तिच्या निरागसतेचा देखील फॅन झाला. १५ स्पर्धकांसह सुरू झालेला हा प्रवास अखेर संपला. या शोचे उपविजेते ठरलेल्या ४ स्पर्धकांना एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर फ्लोरिनाला ट्रॉफीसह १५ लाखांचा चेक मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दहावी पास होताच मिळाले चित्रपटात काम करण्याचे बक्षीस, ‘या’ कारणामुळे नाव बदलून फिरत होती श्रृती मराठे

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा