Year Ending 2021: सुपरस्टार कलाकारांचे २०२१ मध्ये ‘हे’ सिनेमे ठरले सुपरफ्लॉप, अनपेक्षित चित्रपटही यादीत सामील


या वर्षी सुरुवातीच्या काळात अनेक सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले तर काही चित्रपटगृहांमध्ये. २०२१ मध्ये ‘राधे’, ‘बंटी और बबली’, ‘हंगामा २’, ‘रूही’, ‘सत्यमेव जयते २’, ‘सरदार का ग्रॅन्डसन’, यांच्यासह अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला तर काही चित्रपट त्यांच्या पसंतीस उतरले नाही. या यादीमध्ये अनेक सुपरस्टारच्या चित्रपटाचा समावेश आहे, ज्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही.

भुज:द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj: the pride of India) :
अजय देवगनचा चित्रपट भुज: द प्राइड ऑफ इंडिया खूप वाईट पद्धतीने फ्लॉप झाला. मिळालेल्या माहितीनुसार ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपयांच्या जवळपास होते.

रूही (Roohi):
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा चित्रपट लॉकडाऊनआधी चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जान्हवी कपूरने एका भुताने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. तर राजकुमार राव तिच्यावर प्रेम करतो आणि तिला भुताच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी खटपट करताना दिसला. वरुण शर्मा देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत होता. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना नाराज करून गेला.

हंगामा २ (Hungama 2):
या चित्रपटात शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) परेश रावल (Paresh Rawal ) मिझान जाफरी (mizaan Jafri) आदी मोठे कलाकार होते. चित्रपटात अनेक विनोदी कलाकारांचा समावेश होता, पण या चित्रपटाने देखील आयएमडीबीवर फक्त ३.१ रेटिंग मिळवली. या सिनेमाच्या निमित्ताने शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनी सिनेमात दिसली.

द गर्ल ऑन द ट्रेन (the girl on the train) :
परिणीती चोप्राचा सस्पेन्स थ्रिलर आणि बहुचर्चित असणाऱ्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण हा चित्रपटही सुपरफ्लॉप ठरला.

बंटी और बबली२(bunty aur Babli 2) :
सैफ अली खान, राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असणारा आणि बंटी और बबली सिनेमाचा सिक्वल असणारा बंटी और बबली २ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर वाईट प्रकारे फ्लॉप ठरला.

थालयवी (thalavi) :
कंगना रनौतचा हा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित चित्रपट देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला मात्र प्रेक्षकांना हा तितकासा भावला नाही. या चित्रपटाने तीन आठवड्यात सुमारे १२ ते १४ कोटी रुपये कमावले.

सरदार का ग्रँडसन (sardar ka grandson) :
अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा देखील फ्लॉप ठरला. या चित्रपटाची स्टोरी खूप कंटाळवाणी होती. प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला.

सत्यमेव जयते २ (Satyamev Jayate 2) :
या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार होते. या चित्रपटाचे बजेट २६० कोटी रुपये होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

राधे (Radhe) :
दबंग खान सलमान खानचा आणि दिशा पटानीचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित राधे या चित्रपटाला आयएमडीबीवर खूप कमी रेटिंग मिळाले. या चित्रपटाची स्टोरी पाहून प्रेक्षकांनी हा देखील चित्रपट नाकारला होता.

हेही वाचा :

हेही पाहा-


Latest Post

error: Content is protected !!