सुपरस्टार अक्षय कुमारच्या प्रत्येक चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. विशेष म्हणजे तो ज्या चित्रपटात काम करतो, तो चित्रपट आधीच हिट समजला जातो असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सन २०१२मध्ये अक्षयचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळाली होती. अशातच आता अक्षयच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. त्याच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचे पहिले पोस्टर अक्षयने प्रदर्शित केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दुसरीकडे अक्षयनेही आपल्या या चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. त्याने जे पोस्टर प्रदर्शित केले आहे, ते पाहिल्यानंतर प्रेक्षकांना वाट पाहणे कठीण होत आहे. (Superstar Akshay Kumar Shares First Poster of His Upcoming Movie Oh My God 2 Actor Will Be Seen As Mahadev)
अक्षयने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यावरून समजते की, अक्षय यावेळी ‘ओह माय गॉड २’ चित्रपटात महादेवाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्याने चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. यातील पहिल्या पोस्टरमध्ये देवाने भक्ताचा हात पकडल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अक्षय स्वत: महादेवच्या रूपात दिसत आहे. त्याच्या या पोस्टरला चाहत्यांकडून जबरदस्त पसंती मिळत आहे.
अक्षयने हे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “कर्ता करे न कर सके शिव करे सो होय. तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांची आवश्यकता आहे. ओएमजी २ साठी आमचा खरा आणि प्रामाणिक प्रयत्न एक आवश्यक सामाजिक मुद्दा उचलणे आहे. आदियोगी या यात्रेसाठी आम्हाला आशीर्वाद द्या. हर हर महादेव.”
अक्षयने या चित्रपटातील सहकलाकार पंकज त्रिपाठीसह महाकालच्या उज्जैन नगरीत बाबा महाकालचे दर्शन घेतले. यानंतर त्याने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाचे उज्जैन येथे १७ दिवसांची शूटिंग नियोजित आहे. इथे चित्रपटातील काही सीन अक्षयसोबत महाकालच्या मंदिरात शूट केले जातील. चित्रपटाची उर्वरित शूटिंग इंदोरमध्येच होणार आहे. दुसरीकडे अक्षयव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
विशेष म्हणजे यापूर्वी ‘ओह माय गॉड’ या चित्रपटात अक्षय श्रीरामाच्या भूमिकेत दिसला होता. तसेच त्याच्यासोबत परेश रावलही मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर
-क्रिकेटप्रेमी असणाऱ्या उर्वशी रौतेलाने बुक केले भारत पाकिस्तानच्या सामन्याचे गोल्डन तिकीट
-जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला