Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी पुन्यांदा एकत्र येणार अमिताभ बच्चन आणि पंकज त्रिपाठी; सोबत राबवणार अभियान…

रस्ते सुरक्षा मोहिमेसाठी पुन्यांदा एकत्र येणार अमिताभ बच्चन आणि पंकज त्रिपाठी; सोबत राबवणार अभियान…

रस्ते सुरक्षा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीत पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार मिळून लोकांना रस्ता सुरक्षेबद्दल जागरूक करतील, या मोहिमेचा उद्देश लोकांचे जीव वाचवणे आहे. ही मोहीम केंद्रीय रस्ते सुरक्षा आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश रस्ते अपघात कमी करणे आहे.

रस्ता सुरक्षा मोहिमेशी जोडल्याबद्दल पंकज त्रिपाठी म्हणतात, ‘अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरीजी आणि रस्ता सुरक्षा मोहिमेच्या संपूर्ण टीमसोबत पुन्हा एकदा हातमिळवणी करणे हा एक सन्मान आहे. रस्ता सुरक्षा हा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. या उपक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.

पंकज त्रिपाठी पुढे म्हणतात, ‘या मोहिमेचा उद्देश लोकांचे, विशेषतः मुलांचे जीवन सुरक्षित ठेवणे आहे. मी सर्व नागरिकांना रस्ता सुरक्षा स्वीकारण्यास सांगू इच्छितो, आपल्या देशाच्या भविष्याची म्हणजेच आपल्या मुलांची सुरक्षितता आणि कल्याण यातच दडलेले आहे.

पंकज त्रिपाठी आणि अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त, इतर अनेक सेलिब्रिटी देखील रस्ता सुरक्षेच्या उदात्त मोहिमेशी जोडलेले आहेत. या यादीत प्रसून जोशी, शंकर महादेवन, आर. माधवनसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी यात सहभागी झाले आहेत. या मोहिमेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये या लोकांनी आपला आवाज उठवला आहे. याशिवाय, आध्यात्मिक गुरू सद्गुरु आणि उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती देखील रस्ता सुरक्षा मोहिमेचा भाग बनल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

पैशांच्या बाबतीत बायको मला मूर्ख म्हणते; बघा काय म्हणाला आर माधवन…

author avatar
Sankalp P

हे देखील वाचा