Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड कमल हसनने बॉलिवूडला दिला माेलाचा सल्ला; म्हणाले, ‘इंग्रजी आधी बंगाली आणि हिंदी…’

कमल हसनने बॉलिवूडला दिला माेलाचा सल्ला; म्हणाले, ‘इंग्रजी आधी बंगाली आणि हिंदी…’

तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार कमल हसन यांनी ‘विक्रम’, ‘चाची 420’, ‘इंडियन 2’, ‘पोंनियिन सेलवन’ यासारखी दमदार चित्रपट सिनेसृष्टीला देऊन चाहत्यांचे मनाेरंजन केले आहे. अशातच कमल हसन हे पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, यावेळी ते आपल्या चित्रपटामुळे नाही, तर वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. नुकतेच मुलाखतीदरम्यान कमल हसन यांनी बाॅलिवूड चित्रपट निर्मात्यांना फार माेलाचा सल्ला दिला आहे. काय म्हणाले कमल हसन? चला जाणून घेऊया… 

अभिनेत्याने दिला हिंदी आणि बंगाली चित्रपट पाहण्याचा सल्ला
अलीकडेच कमल हसन (kamal haasan) एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांसोबत एका शोमध्ये पाेहचले हाेते. यादरम्यान त्यांना बॉलीवूडच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता, अभिनेता म्हणाले, “इंग्रजी चित्रपट पाहण्याआधी तुम्ही भारतीय चित्रपट पाहा. हिंदी चित्रपट आणि बंगाली चित्रपट पाहा, हा माझा सल्ला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

त्यांनी पुढे सांगितले की, “हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली आहे, मी त्यांचा खूप आदर करतो.” आपला मुद्दा पुढे ठेवत ते म्हणाले, “उत्तरायण आणि दक्षिणायन असे काहीतरी असते. सूर्यप्रकाशासारखेच कमर्शियल जग चालते. आत्ता, ते इथे (दक्षिणेत) चमकत आहे. आम्ही ती तशीच ठेवू अशी आशा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

कमल हसनच्या विक्रम चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर केला विक्रम
विशेष म्हणजे, या वर्षी कमल हसनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले. लोकेश कनगराज दिग्दर्शित या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली. (`super`star kamal haasan advised bollywood filmmakers to watch hindi and bengali movie)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टायगर नव्हे तर ‘या’ व्यक्तिच्या प्रेमात पडली दिशा? खुद्द केला खुलासा

कहरच! उर्फिने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ; स्वतःलाच म्हणाली, ‘बेशरम, हास्यास्पद, अश्लील…’

हे देखील वाचा