बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी वयाची पन्नाशी आणि साठी ओलांडली आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडे पाहिले, तर अजूनही ते एकदम तरुण दिसतात. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर आपण अनिल कपूर यांचे नाव घेऊ शकतो. वयाच्या ६५व्या वर्षीही ते तरुण मुलाप्रमाणे दिसतात. मात्र, असेच काहीसे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एका अभिनेत्याबाबतही आहे. हा अभिनेता इतर कोणी नसून सुपरस्टार कमल हासन आहेत. त्यांनी अनिल कपूर यांनाही फिटनेसच्या बाबतीत टक्कर दिली आहे. त्यांनी नेमके असे काय केले आहे, चला जाणून घेऊया…
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) हे अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्यापेक्षा २ वर्षांनी मोठे आहेत. ६७ वर्षीय कमल हासन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते २६ पुशअप्स (Kamal Haasan 26 Pushups) मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणत आहेत की, ते अनिल कपूर यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे आहेत.
@ikamalhaasan sir's video as promised.. He did 26..i missed recording the initial two..
The eagle has landed????#Vikram pic.twitter.com/5rdKG9JPoE— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) June 28, 2022
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम’ (Vikram) या सिनेमात कमल हासन यांनी अनेक फाईट सीन केले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते पुशअप्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
कमल हासन यांचा हा व्हिडिओ शेअर करत दिग्दर्शक लोकेश यांनी ट्वीट केले की, “त्यांनी २६ पुशअप्स मारले… मी सुरुवातीचे दोन रेकॉर्ड करण्यास चुकलो.” हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ७० हजारांहून अधिक लाईक्सही या व्हिडिओला मिळाले आहेत.
View this post on Instagram
वयाच्या ६७व्या वर्षीही कमल हासन यांनी स्वत:ला अशाप्रकारे फिट ठेवल्यामुळे चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. त्यांना २६ पुशअप्स करताना पाहून एका चाहत्याने लिहिले की, “ते खरंच ६७ वर्षांचे आहेत का?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “अनेक तरुण अभिनेत्यांपेक्षांही फिट आहेत.” एकाने तर असे लिहिले की, “भारताचे सर्वात फिट अभिनेते, त्यांना सिक्स पॅकची गरज नाहीये.”
सिनेमाची बक्कळ कमाई
‘विक्रम’ या सिनेमाच्या कमाईबाबत बोलायचं झालं, तर या कमल हासन, विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांच्या या सिनेमाने ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा कमल हासन यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे. विशेष म्हणजे, रजनीकांत यांच्या ‘२.०’ सिनेमानंतर तमिळमधील सर्वाधिक कमाई करणारा ‘विक्रम’ हा दुसरा सिनेमा बनला आहे.
विशेष म्हणजे, कमल हासन यांनी आतापर्यंत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा २००हून अधिक सिनेमात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-