Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन मिथुन चक्रवर्तींची सून म्हणतेय ‘नको गं बाई’, लग्नाच्या चार वर्षांनंतरही बनायचं नाही आई

मिथुन चक्रवर्तींची सून म्हणतेय ‘नको गं बाई’, लग्नाच्या चार वर्षांनंतरही बनायचं नाही आई

प्रसिद्ध अभिनेते आणि ज्यांना बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर‘ म्हणून ओळखले जातात असे म्हणजे अभिनेते मिथुन चक्रवर्ती होय. मिथुन यांनी त्यांच्या अस्सल अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा आणि सूनदेखील अभिनयात काम करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांची सून मदालसा शर्मा ही भोजपुरी आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मदालसाने मिथुन यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती याच्यासोबत २०१८ साली संसार थाटला होता. त्यांच्या लग्नाला ४ वर्षे उलटून गेली आहेत, पण अद्याप ती आई बनली नाहीये. अशामध्ये अभिनेत्रीच्या कुटुंब नियोजनेबाबत जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फक्त कलाकारांनाच त्यांच्या कुटुंब नियोजनाबाबत विचारले जात नाही, तर सामान्य स्त्रीलादेखील अशा प्रश्नांचा सामना करावा लागतो. असाच एक प्रश्न मिथुन चक्रवर्ती यांची सून (Mithun Chakraborty Daughter In Law) मदालसा शर्मा (Madalsa Sharma) हिला विचारण्यात आला. तिला प्रेग्नंसी आणि कुटुंब नियोजनाबाबत प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, तिने आतापर्यंत आई बनण्याचा निर्णय का घेतला नाही. ती म्हणाली की, आईची जबाबदारी पार पाडण्यासाठी ती अद्याप तयार नाहीये.

मदालसाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिचे सहकलाकारही तिच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्न विचारत असतात. ती म्हणते की, “आता माझा आणि मिमोहचा कुटुंब नियोजनाचा कोणताही विचार नाहीये.” म्हणजेच, ते कुटुंब वाढवण्याबाबत विचार करत नाहीयेत.

आई बनण्यासाठी तयार नाहीये मदालसा
मदालसा आयुष्यातील हा टप्पा खूप महत्त्वाचा असल्याचे मानते. तिला माहिती आहे की, तिला पुढे जाऊन आईची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ती यासाठी मानसिकरीत्या तयार होण्याला महत्त्व देते. “आयुष्यातील ही जबाबदारी निभावण्यासाठी स्वत:ला मानसिकरीत्या तयार करावे लागते,” असे ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली.

मदालसाकडून मिमोहची प्रशंसा
महाक्षय चक्रवर्ती (Mahaakshay Chakraborty) याला मिमोह (Mimoh) या नावानेही ओळखले जाते. मदालसाही त्याला मिमोह नावानेच पुकारते. हे जोडपे सध्या आई-वडिलांची जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार नाहीत. मदालसाने सांगितले की, “आम्ही आता तयार नाही. जेव्हा तयार होऊ, तेव्हा याचे नियोजनही करू. मी आता फक्त स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे.” तिने मिमोहला एक प्रामाणिक आणि काळजी घेणारा पतीदेखील म्हटले आहे.

मदालसाचे सिनेमे
मदालसाबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक बंगाली आणि कन्नड सिनेमातही काम केले आहे. त्यात ‘शौर्य’, ‘मेरा इरादा’, ‘एंजेल’, ‘वेत्ताईकारन’, ‘मेरी सरकार’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ती सध्या ‘अनुपमा’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतही काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनयासाठी खाल्ला वडिलांचा मार, आईकडून ५०० रुपये घेत पोहोचला मुंबईत; आता कोटींचा बनलाय मालक

प्रतिभा असूनही एका संधीसाठी करावा लागला संघर्ष, ‘या’ सिनेमाने रातोरात चमकलेलं अभिनेत्रीचं नशीब

‘शेहजादा’मधील कार्तिक आर्यनचा लूक पाहून वाढली चाहत्यांची उत्कंठा, पण बदललीय…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा